Indian Submarine Accident With Fishing Boat 
गोवा

Indian Navy Goa: 'त्या' अपघातात नौदलाच्या पाणबुडीचे 10 कोटीचे नुकसान; 2 मृत्यूप्रकरणी मासेमारी बोटीवरील कॅप्टनला अटक

Indian Navy Submarine Accident: बोट बेफिकिरपणे चालवणे, इतरांचा जीव धोक्यात घालणे असे आरोप कॅप्टन विरोधात ठेवण्यात आलेत.

Pramod Yadav

Indian Navy Submarine And Fishing Boat Accident

मुंबई: भारतीय नौदल आणि मासेमारी बोटचा झालेल्या अपघातात बेपत्ता दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला. तसेच, या अपघातात नौदलाच्या पाणबुडीचे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मार्थोमा मासेमारी बोटवरील कॅप्टनला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. बोटीवरील दोघांच्या मृत्यूप्रकरणी कॅप्टनला दोषी धरण्यात आले आहे. तसेच, बेफिकिरपणे बोट चालवणे आणि इतर आरोप कॅप्टनवर ठेवण्यात आले आहेत.

एफव्ही मार्थोमा या मासेमारी बोट आणि भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गोव्याच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे ७० नॉटिकल मैलांवर अरबी समुद्रात हा अपघात झाला.

या अपघातप्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्याने यलो गेट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी मार्थोमा मासेमारी बोटच्या कॅप्टनला अटक केलीय. बोट बेफिकिरपणे चालवणे, इतरांचा जीव धोक्यात घालणे असे आरोप कॅप्टन विरोधात ठेवण्यात आलेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

२१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर मार्थोमा मासेमारी बोट पाण्यात बुडाली. यावेळी बोटीत १३ लोक होते. अपघातानंतर नौदल, तट रक्षक दलाने तात्काळ बचावकार्य सुरु केले होते. यासाठी मुंबई तटरक्षक दलाची देखील मदत घेण्यात आली. ११ जणांना यावेळी वाचवण्यात यश आले तर दोनजण बेपत्ता झाले होते. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT