Indian Navy Search Operation 
गोवा

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Indian Navy Ship Collide With Fishing Boat In Goa: गोवा आणि मुंबईच्या किनारी भागात असलेल्या एजन्सीही पूर्ण तयारीनिशी शोध मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.

Pramod Yadav

Indian Navy Ship Collide With Fishing Boat In Goa

पणजी: गोव्यात मासेमारी बोट 'मार्थोमा' आणि भारतीय नौदलाच्या जहाजाची टक्कर झाली आहे. मासेमारी बोटीत 13 जण होते, त्यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले असून, दोनजण अद्याप बेपत्ता आहेत. नौदलाची यासाठी शोध आणि बचाव (SAR) ऑपरेशन सुरू केले आहे. 21 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी गोव्याच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे 70 नॉटिकल मैलांवर हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारी बोटीतील बेपत्ता दोघांच्या शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाने सहा जहाजे आणि काही चॉपर तैनात केली आहेत.

तसेच, मुंबईस्थित सागरी बचाव समन्वय केंद्राच्या (MRCC) सहकार्याने बचावकार्य तीव्र करण्यात येत आहे.

शोधमोहिमेसाठी भारतीय नौदलाने ताबडतोब आसपासची जहाजे आणि चॉपर घटनास्थळी पाठवली आहेत. नौदलाने जहाजे आणि विमानांशिवाय इतर संसाधनांचाही या बचाव कार्यासाठी मदत घेतली आहे.

गोवा आणि मुंबईच्या किनारी भागात असलेल्या एजन्सीही पूर्ण तयारीनिशी या शोध मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.

दोन जहाजांची टक्कर नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला जाईल, मात्र सध्या बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यास प्राधान्य दिले जात आहे.

दरम्यान, या अपघातामुळे सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बचाव कार्याशी संबंधित ताजी अपडेट लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. बेपत्ता सदस्यांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचे नौदलाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ‘रो-रो’ दुरुस्तीला !

Margao Crime: 'आईचे दागिने करायचे आहेत' म्हणत आला, हातोड्याने केला हल्ला; मडगाव प्रकरणातील संशयित बोलत होता कोकणी

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT