पणजी: गोव्यातून गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी जागतिक प्रवासावर गेलेली भारतीय नौदलाची ‘तारिणी’ ही शिडाची नौका केप टाऊन येथून परतीच्या प्रवासाला निघाली आहे. मे महिन्यामध्ये ती गोव्यात पोहोचणार आहे. ही मोहीम (प्रदक्षिणा २) भारतात महासागरी नौका विहाराला प्रोत्साहन देणे, गणवेशातील भारतीय महिलांचे धैर्य व क्षमतांचे प्रदर्शन करणे आणि स्वदेशी जहाज बांधणीतील भारताची प्रगती अधोरेखित करणे, या प्रमुख उद्देशांनी प्रेरित आहे.
ही मोहीम लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहे. ‘तारिणी’ने केप टाऊन (Cape Town) (दक्षिण आफ्रिका) येथे नियोजित थांबा घेतला होता. या थांब्यादरम्यान तारिणीची नियमित देखभाल व तपासणीदेखील करण्यात आली, जेणेकरून ती प्रवासाच्या अंतिम टप्प्यासाठी सर्वोत्तम स्थितीत राहील. तारिणी मे अखेरपर्यंत गोव्यात (Goa) पोहोचण्याची अपेक्षा आहे.
केप टाऊन बंदरावरील थांब्यादरम्यान राजनैतिक व सामाजिक उपक्रम तारिणीवर आयोजित केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता. प्रभात कुमार (दक्षिण आफ्रिकेतील भारताचे उच्चायुक्त), रेगन अॅलन (वेस्टर्न केपचे उपसभापती), जोनाथन ऱ्होड्स (माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू), किर्स्टन न्यूशेफर (२०२२-२३ च्या प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब रेस विजेती) आणि एक ख्यातनाम सागरी एकल प्रदक्षिणाकार रुबी जसप्रीत.
या भेटीदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाणीस चालना मिळाली आणि भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात वाढती सागरी भागीदारी अधोरेखित झाली. महिला सक्षमीकरण, लिंग समता, भारताची स्वदेशी नौकाबांधणी क्षमता यावर विशेष भर देण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.