SLNS Sayurala  dainik gomantak
गोवा

मिलान 2022 मध्ये भारतीय नौदलाकडून श्रीलंका नौदलाच्या सायुरालाचे जोरदार स्वागत

आज विशाखापट्टणम येथे पोहोचलेल्या श्रीलंका नौदलाच्या (SLN) प्रगत ऑफशोर पेट्रोल व्हेसेल सायुरालाचे भारतीय नौदलाने जोरदार स्वागत

दैनिक गोमन्तक

गोवा : इतर देशांशी समुद्रातील संबंध वाढवण्याच्या आणि ते मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाकडून (Indian Navy) मिलान हा कार्यक्रम हाती घेण्यात येतो. याअंतर्गत विशाखापट्टणम येथे या महिन्यात 'मिलन-2022' नावाने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात दुसऱ्या देशातील लढाऊ नौदल सरावासाठी येत आहेत. याअंतर्गत आज विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे पोहोचलेल्या श्रीलंका (Sri Lanka) नौदलाच्या (SLN) प्रगत ऑफशोर पेट्रोल व्हेसेल सायुरालाचे (SLNS Sayurala (P623) भारतीय नौदलाने जोरदार स्वागत केले.

SLNS सायुराला हे मेसर्स गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधले होते. तर 02 ऑगस्ट 2017 रोजी भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील नौदल आणि सागरी संबंध सुधारण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून याकडे पाहिले जात आहे. या सरावात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रान्स, इंग्लंड, ब्राझील आणि फिलीपिन्ससह एकूण ४६ देशांच्या नौसेनांना आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे मिलन सराव दरम्यान, केवळ बंगालच्या उपसागरात ऑपरेशनल सराव होणार नाही, तर विशाखापट्टणममध्ये सर्व देशांच्या नौसैनिकांची भव्य 'सिटी-परेड' देखील आयोजित करण्यात येईल.

भारतीय नौदलानुसार, या महिन्याच्या 25 तारखेपासून सुरू होणारा मिलान सराव दोन भागात असेल. पहिला हार्बर फेस असेल, जो 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे आणि दुसरा टप्पा 1 ते 4 मार्च दरम्यान समुद्रात असेल. हार्बर फेसमध्ये, सर्व देशांचे नौदल विशाखापट्टणममधील शहर-परेडमध्ये सहभागी होतील तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभागी होतील आणि नौदल अधिकाऱ्यांशी संवाद साधला जाई

याशिवाय एकमेकांच्या सांस्कृतिक वारशाची देवाणघेवाण व्हावी यासाठी आग्रा आणि बोधगया या दोन दिवसांच्या दौऱ्याचाही समावेश केला जाईल. यानंतर बंगालच्या उपसागरात चार दिवसांचा सराव होईल. या वर्षीच्या मिलन सरावाचे ब्रीदवाक्य म्हणजे कॉम्रेडरी, कॉहेजन आणि कोलाबोरेशन म्हणजेच सलोखा, एकता आणि सहकार्य असे आहे.

मिलान सरावाची ही 11वी आवृत्ती असून पहिला मिलान सराव 1995 साली झाला होता. त्यावेळी भारतीय नौदलाशिवाय इतर चार देशांच्या नौदलाने सहभाग घेतला होता. शेवटचा मिलान सराव हा 2018 मध्ये झाला होता. ज्यामध्ये 17 देशांच्या नौदलांनी भाग घेतला होता. आत्तापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मिलान सरावाच्या सर्व आवृत्त्या झाल्या आहेत. तर सिटी ऑफ डेस्टिनी म्हणजेच विशाखापट्टणममध्ये हा सराव होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT