गोवा

Viral Video: विदेशी वधू, भारतीय वर! हनीमूनसाठी कपल पोहोचलं गोव्याच्या किनाऱ्यावर, पाहा व्हिडिओ

Goa Honeymoon Couple: एका भारतीय युवकाने परदेशी मुलीसोबत विवाह केला असून, त्यानंतर हनिमूनसाठी हे नवविवाहित जोडपं गोव्याला आलं आहे.

Sameer Amunekar

पणजी: एका भारतीय युवकाने विदेशी वधूसोबत लग्न केलं असून, हनिमूनसाठी हे कपल थेट गोव्याच्या सुंदर किनाऱ्यावर दाखल झालं आहे. या रोमँटिक जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपं गोव्याच्या प्रसिद्ध बीचवर फिरताना दिसत आहे. दोघंही खूप आनंदी आणि उत्साही दिसत असून, समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर दृश्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत.

गोव्याच्या उष्ण समुद्री वाऱ्यात आणि निळ्याशार पाण्यात दोघंही त्यांच्या नव्या प्रवासाचे खास क्षण अनुभवत आहेत.

विदेशी तरूणीसोबल लग्न केलेला युवक का दिल्ली येथील रहिवासी आहे. हा युवक आपल्या विदेशी वधूसोबत गोव्यात हनिमूनसाठी आल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये सांगत आहे.

विदेशी वधू गोव्यात आल्यावर खूप चांगलं वाटल्याचं सांगत आहे. दोघांनीही गोव्याच्या सौंदर्याचं आणि संस्कृतीचं कौतुक केलं आहे. "गोवा खूप आवडलं, इथलं वातावरण, बीच आणि संस्कृती खूपच छान आहे, असं विदेशी तरूणी यावेळी बोलताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

गोवा हनिमून डेस्टिनेशन

गोवा हे नेहमीच प्रेमी युगुलांचं आणि नवविवाहित जोडप्यांचं आवडतं ठिकाण राहिलं आहे. समुद्रकिनारे, लक्झरी रिसॉर्ट्स आणि नाईटलाइफमुळे गोवा नवविवाहितांसाठी एक हनिमून डेस्टिनेशन ठरतं.

गोवा हे हनिमूनसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, देश-विदेशातील अनेक जोडपी येथे आपला खास वेळ घालवण्यासाठी येतात. निसर्गरम्य किनारे, रोमँटिक वातावरण आणि शांतता यामुळे गोवा हे जोडप्यांसाठी सर्वात आवडीचं ठिकाण बनलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT