Badminton  Dainik Gomantak
गोवा

भारतीय ज्युनियर बॅडमिंटन: प्रणव, उन्नती, अनुपमा यांची घोडदौड

ज्युनियर बॅडमिंटन: विजयी कामगिरीसह नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत

दैनिक गोमन्तक

पणजी: प्रणव राव, उन्नती हुडा, अनुपमा उपाध्याय यांनी शानदार विजय नोंदवत अखिल भारतीय ज्युनियर (19 वर्षांखालील) मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. (Indian Junior Badminton: Pranav, Unnati, Anupama in quarterfinals )

मुलांच्या एकेरीत तेलंगणच्या प्रणव राव गंधम याला आगेकूच राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. नवव्या मानांकित पंजाबच्या लक्षय शर्मा याने त्याला तासाभराच्या खेळात चांगलेच झुंजविले. सामन्यात लक्षयने पहिला गेम 21-17 असा जिंकला, नंतर प्रणवने दुसरा गेम जिंकून 21-12 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये प्रणव 11-7 असा आघाडीवर असताना लक्षयने स्नायूदुखी असह्य झाल्याने सामना सोडला.

मुलांच्या एकेरीतील अन्य एका लढतीत आयुष शेट्टी याने 41 मिनिेटे झुंज दिल्यानंतर निकोलस नॅथन राज याला 21-9, 14-21, 21-12 असे नमविले.

मुलींत प्रमुख खेळाडू विजयी

स्पर्धेतील विेजेतेपदाची दावेदार असलेली हरियानाची उन्नती हुडा हिने अवघ्या 26 मिनिटांत महाराष्ट्राच्या आलिशा नाईक हिचा 21-13, 21-16 असा फडशा पाडला. अनुपमा उपाध्याय हिला मात्र संघर्ष करावा लागला. तिने उत्तर प्रदेशच्या समायारा पनवर हिला 21-10, 24-22 असे नमविले. त्यापूर्वी अनुपमाला तारा शाह हिने झुंजविले. तारा सामन्यातून निवृत्त झाली तेव्हा अनुपमा 12-21, 22-20, 13-5 अशी आघाडीवर होती. गार्गी अनमोल खर्ब, तनू चंद्रा यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

यजमान गोव्याचे आव्हान संपुष्टात

निशांत शेणई याच्या पराभवामुळे यजमान गोव्याचे मुलांच्या एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीतील लढतीत त्याला समरवीर याने 21-9, 21-17 असे हरविले. दुहेरीतही गोव्याच्या खेळाडूंना यश मिळाले नाही. मुलांत यश हळर्णकर व आर्यमान सराफ यांना तमिळनाडूच्या बी. कार्तिक राजा व पी. पार्थ वैद्य जोडीने 21-14, 21-10 असे, तर मुलींत सिनोव्हिया डिसोझा व प्रतिष्ठा शेणॉय जोडीस हर्षिता रौत व श्रुती स्वेन जोडीने 21-7, 21-10 असे नमविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT