नरेंद्र सावईकर Dainik Gomantak
गोवा

Goa In BJP : भारतीयांच्या रक्तातच भिनलीय लोकशाही : नरेंद्र सावईकर

दक्षिण गोवा भाजपा समितीतर्फे काळादिन साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

भारत व इतर देशांमधील लोकशाही प्रणालीमध्ये वेगळेपण आहे. भारतातील लोकशाहीमधील वेगळेपण, हे की भारतीयांच्या रक्तात लोकशाही भिनली आहे. म्हणूनच १९७५ साली तेव्हाच्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी देशात जाहीर केली. हा हुकूमशाही पद्धतीचा निर्णय भारतीयांनी हाणून पाडला.

आणीबाणीच्या काळात जे नेते तुरुंगात होत, ते निवडणुकीत जिंकून आले व कॉंग्रेसचा पराभव झाला, असे माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

25 जून हा काळा दिन म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे देशभर पाळला जातो. दक्षिण गोवा भाजप समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नरेंद्र सावईकर हे बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारतात पंचायत स्तरापासून राज्य व केंद्र सरकारपर्यंत लोकशाही आहे. समाजातील सर्वच लोकांना सुद्धा आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाने लोकशाहीला काळा डाग फासला.

कॉंग्रेस पक्षाला लोकशाहीची खरी ताकद केव्हाच समजली नाही. केवळ कशाही पद्धतीने सत्ता मिळवणे हेच केवळ कॉंग्रेसचे तत्त्व राहिले आहे. भारतीय जनता पक्षाचा लोकशाहीवर पूर्ण विश्र्वास व श्रद्धा आहे. त्यामुळे आजच्या व पुढील पिढीला 1975 सालीच्या आणीबाणी काळातील इतिहास सांगणे गरजेचे असल्याचे सावईकर यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

Crime News: घरातच बनवली 'स्मशानभूमी'! आई-वडिलांना मारुन मुलानं घरातच गाडलं; बहिणीच्या प्रेमप्रकरणातून संपवलं संपूर्ण कुटुंब

‘आमचे गोंय आमकां जाय, तुमी भायले तुमच्या देशान वचात’! पोर्तुगीज पोलिसांनी फुटक्या ‘काऊटेल’ चाबकानं अक्षरश: फोडून काढलं..

Goa Congress: काँग्रेस गोव्यात आक्रमक होऊ शकेल?

भाजप अध्यक्षांचा 'नादखुळा' अंदाज! म्हापशात कार्यकर्त्यांमध्ये भरलं स्फुरण; नितीन नवीन यांच्या ढोलवादनानं वेधलं सर्वांचं लक्ष Watch Video

SCROLL FOR NEXT