government water project fire Dainik Gomantak
गोवा

Sankhalim News: देशातील पहिल्या कृषी जलपुरवठा प्रकल्पाला आग; उद्घाटनानंतर महिन्याभरातच दुसरी घटना

Irrigation Project News: खाण खंदकातून शेतकऱ्यांना स्वयंचलित यंत्र व्यवस्थेद्वारे पाणी पुरविणाऱ्या देशातील पहिल्या प्रकल्पाच्या जलवाहिनीला पुन्हा आग लागली आहे

Akshata Chhatre

साखळी: सोनशी सुर्ल, साखळी येथील खाण खंदकातून शेतकऱ्यांना स्वयंचलित यंत्र व्यवस्थेद्वारे पाणी पुरविणाऱ्या देशातील पहिल्या जलवाहिनी प्रकल्पाला पुन्हा आग लागली आहे. यापूर्वी देखील असाच प्रकार दोन-तीन वेळा घडला असल्याने प्रकल्पाला विलंब झाला होता. साधारण महिन्याभरापूर्वी उद्घाटन होऊन कार्यान्वित झालेल्या या प्रकल्पाच्या पाईपलाईनला आग लागल्याने सगळीकडेच खळबळ उडाली.

पाईपलाईनला अचानक आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरातील जंगलाला देखील आग लागली. सध्या मात्र ही आग लागली की जाणीवपूर्वक लावण्यात आलीये याची चौकशी सरकारने करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी एक शेतकरी विष्णू नाटेकर यांनी केली आहे.

सोनशी सुर्ल येथे ८ मार्च रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते आणि प्रकल्पाच्या बाजूने मोकळ्या जागेत काहीतरी शेती-बागायती करावी असा आदेश आल्याने स्थानिक तिथे कणसांचं पीक उगवायचे.

या पिकाची गुरांकरवी नासाडी होते म्हणून शेतकऱ्यांनी पिकांचं रक्षण कारण्यासाठी कुंपण बांधलं होतं जिथे गुरुवार (दि.१७) रोजी काहीसा धूर आणि आग लागल्याचा संशय येऊ लागला.

संशयाची पुष्टी करण्यासाठी जवळ जाऊन पाहताच आग लागल्याची माहिती मिळाल्याचं विष्णू नाटेकर यांनी सांगितलं. एकूण साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पामुळे अनेकांना फायदा व्हायचा मात्र या आगीमुळे आणि नासाडीमुळे पाईपलाईन खराब झालीये आणि एवढे रुपये खर्च करून उपभरलेल्या प्रकल्पाचे नुकसान झाल्याने स्थानिक शेतकरी विष्णू नाटेकर यांनी हळहळ व्यक्त केली.

यापूर्वी देखील झालेल्या अशाच एका प्रसंगात पाईपलाईन जळाल्याने सत्तर लाख रुपयांचं नुकसान झालं होतं, यानंतर प्रकरणाची चौकशी झाली पण नेमका आरोपी कोण आणि हा प्रकार का सुरु आहे याची अद्याप माहिती मिळाली नसल्याचं नाटेकर यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT