Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM: देशभरात शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम इंडिया आघाडी करतेय; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे फार्मागुढी, बांदोडा, फोंडा आणि केपे तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसान झाली.

Pramod Yadav

देशभरात शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम इंडिया आघाडी करतेय, असा आसा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी (२९ जुलै) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत भाजप सरकार सकारात्मक असल्याचे सावंत यांनी सांगताना इंडिया आघाडीवर टीका केली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतल्याने गोंधळात सभापतींने सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

"हे सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे, त्यांना देणारे हे सरकार आहे. त्यांना भडकविण्याचे काम तुम्ही करु नका. देशभरात शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम इंडिया आघाडी करत आहे", अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी सावंत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेताना मुख्यमंत्री विषयांतर करुन लाडू देत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर फिरत शेतकरी आणि सामान्य लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या, असे आलेमाव म्हणाले.

गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे फार्मागुढी, बांदोडा, फोंडा आणि केपे तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसान झाली. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार लक्षवेधी मांडली.

या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करुन गणेश चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री रिलीफ फंडातून देखील त्यांना काही मदत देता येईल का किंवा येत्या काळात या शेतकऱ्यांसाठी काही ठोस योजना तयार करता येईल का याचा देखील विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात दिली.

गेल्या वर्षीच्या काही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. अर्ज केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना देखील अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

SCROLL FOR NEXT