Agriculture Dainik Gomantak
गोवा

Agriculture: शेतजमिनींच्या रूपांतराचे प्रमाण वाढले; दक्षिण गोव्यात सर्वाधिक

नगर नियोजन कायद्यात जे बदल केले आहेत ते गोव्यातील शेतजमिनीवर गदा आणणारे, असा जो पर्यावरण कार्यकर्ते आरोप करत होते.

दैनिक गोमन्तक

Agriculture: नगर नियोजन कायद्यात जे बदल केले आहेत ते गोव्यातील शेतजमिनीवर गदा आणणारे, असा जो पर्यावरण कार्यकर्ते आरोप करत होते तो खरा असल्याचे आता सरकारी आकडेवारीवरूनच सिद्ध झाले आहे. हल्लीच्या काळात गोव्यातील तब्बल 8,263 शेतजमिनींचे बिगर शेतजमिनीत रूपांतर झाले आहे. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात हे प्रमाण अधिक आहे.

राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी संसदीय अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.

उत्तर गोव्यात एकूण 3,864 तर दक्षिण गोव्यात एकूण 4,399 शेतजमिनींचे रूपांतर करण्यात आले आहे. गोव्यातील एकेकाळी कृषी संपन्न असा तालुका म्हणून प्रसिद्ध होता त्या सासष्टी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 2,593 जमिनींचे रूपांतरण करण्यात आले आहे.

जमीन वापर हा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारित येत असल्याने केंद्राने गोवा सरकारकडून ही माहिती मागवून घेतली होती. त्यात दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात (नेमकी जागा नमूद केलेली नाही) 2,248 जमिनींचे रूपांतरण करण्यात आले.

त्यानंतर बार्देस (851), फोंडा (810), केपे (493), मुरगाव (358), तिसवाडी (357), डिचोली (286), पेडणे (107) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. त्यामानाने काणकोण (82), सांगे (44), धारबांदोडा (19) आणि सत्तरी (15) या ग्रामीण भाग असलेल्या तालुक्यात शेतजमीन रूपांतर करण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.

पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते ओलेन्सिओ सिमॉॅइस यांना याबद्दल विचारले असता उत्तर गोव्यात आधीच मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी रूपांतरित केल्या आहेत. तिथे रूपांतर करण्यासाठी जमीन शिल्लक तरी कुठे आहे, असा उलटा सवाल त्यांनी केला.

शेतजमिनींचे रूपांतर करण्यामागे राजकारणी आणि भूमाफिया सक्रिय असल्याचा आरोप पूर्वीचे नौदलाचे कप्तान आणि सध्याचे पर्यावरण चळवळीतील नेते कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केला.

यापूर्वी उत्तर गोव्यातील काही जमीन रूपांतरणात रशियन भूमाफियांचा हात होता. त्यांनी गोव्यातील राजकारण्यांशी हातमिळवणी केली होती. हे राजकारणी आता सत्ताधारी मंत्री बनले आहेत, असा आरोपही फर्नांडिस यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT