राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गोव्यातील सत्तरी आणि फोंडा भागातील गुरांमध्ये लम्पी स्किन आजाराचा धोका वाढताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. अखिल गोवा दूध उत्पादक संघाने याबद्दल कळवले असून याबद्दल चिंता व्यक्त केलीय.
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो. नेमकी या आजाराची लक्षणे काय आहेत, पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
लम्पी आजार कशामुळे होतो?
या रोगाची लागण कॅप्रीपॉक्स नावाच्या विषाणू मुळे होते. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. त्याचबरोबर गुरांच्या गोठ्यातील माशा, विशिष्ट डास आणि गोचीड यांच्यामुळे सुद्धा हा आजार होतो. हा आजार मुख्यतः गायी बैल म्हैस या प्रकारातील जनावरांना होतो.
जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे
लसिका ग्रंथींना सूज येणे.
जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर त्यांना 102 ते 104 पर्यंत ताप येतो.
त्याचबरोबर मान, पोट, कास या ठिकाणी जवळपास दहा एमएम व्यासाच्या गाठी येतात.
दुभती जनावरे दूध कमी देतात त्याचबरोबर पाणी आणि चारा कमी खातात.
काही जनावरांच्या पायाला सूज येते तर काही लंगडतात सुद्धा.
जनावरांना लम्पी आजार झाल्यास-
वरील प्रकारे कुठलीही लक्षणे आपल्या जनावरांना दिसून आली. तर तात्काळ आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय विभागास माहिती द्या.
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.