PUC Dainik Gomantak
गोवा

‘PUC’च्या शुल्कात 30 टक्के वाढ करा; व्हेंडर्स असोसिएशनच्या सदस्यांची मागणी

बैठकीत राज्यभरातील पीयूसी सेंटर चालकांची उपस्थिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पीयूसी प्रमाणपत्रासाठी 2006 मध्ये वाहतूक खात्याने शुल्क वाढविले होते. त्या शुल्कामध्ये किमान 30 टक्के वाढ करावी, अशी मागणी पीयूसी व्हेंडर्स असोसिएशनच्या माशेल येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी राज्यभरातून पीयूसी सेंटर चालकांची उपस्थिती होती.

बैठकीत व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली. खासगी केंद्रांना वाहतूक खात्याकडून एका वर्षासाठी ‘पीयूसी’ देण्याकरिता मान्यता देते, त्यासाठी आकारले जाणारे शुल्कही मोठ्या प्रमाणात वाढविले आहे.

यापूर्वी एका वर्षाच्या परवान्यासाठी 3 हजार रुपये शुल्क होते, ते आता 15 हजार करण्यात आले आहे. ही वाढ अन्यायकारक असून, तो परवाना पाच वर्षांसाठी करावा, अशी मागणीही याप्रसंगी उपस्थित सदस्यांनी केली.

आता पेट्रोल पंपांवरही पीयूसी प्रमाणपत्र देण्याची सोय केली जाणार आहे. याला आमचा विरोध नाही, परंतु अशा परवानग्या देताना किमान पाच किलोमीटर अंतर पंपांमध्ये असावे, अशी सूचनाही सदस्यांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT