Increase in waste and parking problems on Verna-Mormugao National Highway Dainik Gomantak
गोवा

वेर्णा-मुरगाव राष्ट्रीय महामार्गावर कचरा आणि पार्किंग समस्येत वाढ; कारवाईची मागणी

महामार्गावर प्राधिकरणाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांबरोबर नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमन्तक

वेर्णा ते मुरगाव बंदरापर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला कचऱ्याबरोबर वाहन पार्किंग समस्येत वाढ झाली आहे. वास्को वरुणापुरी, गांधीनगर महामार्गाच्या बाजूस कचऱ्याच्या ढीगाऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या कचऱ्याबरोबर वाहन पार्किंग करणार्‍यांवर राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांबरोबर नागरिकांकडून होत आहे. (Increase in waste and parking problems on Verna-Mormugao National Highway Demand for action

वेर्णा (Verna) ते मुरगाव बंदरापर्यंत पूर्ण झालेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे (National Highway) अवजड वाहनांबरोबर इतर वाहनांची चांगली सोय झाली आहे. मात्र दाबोळी विमानतळ, वास्को, शांतीनगर, मांगुरहिल, वरुणापुरी, गांधीनगर येथील महामार्गाच्या बाजूस सर्रासपणे वाहने पार्क करून राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन अनेक वाहनचालक करीत आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर वास्को वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. महामार्गावर वाहन पार्किंगमुळे अपघातात वाढ होत असून यावर त्वरित कडक कारवाई संबंधित विभागाने करणे अत्यंत गरजेचे आहे.

दरम्यान दाबोळी विमानतळ महामार्ग, शांतीनगर ते मांगुरहिल, वरुणापुरी, गांधीनगर या ठिकाणी महामार्गाच्या बाजूस रस्त्यावर कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहे. यामुळे तिथे भटकी गुरे, कुत्र्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर महामार्गावर असलेल्या कचऱ्यामुळे वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कचरा उचलण्यावर उपाययोजना आखावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT