Rice production Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Rice Production Goa: गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घट म्हणजे फिश करी राइस, मासे जरी समुद्रातून मिळत असले तरी तांदळांसाठी भातशेती करावी लागते.

Sameer Panditrao

पणजी: गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घट म्हणजे फिश करी राइस, मासे जरी समुद्रातून मिळत असले तरी तांदळांसाठी भातशेती करावी लागते. अस्मानी संकटावर मात करीत शेतकरी कष्टाने भात लागवड करतात, भात मळून नंतर उकडे तांदूळ बनविले जातात. मागील पाच वर्षातील तांदूळ उत्पादनाचा आढावा घेतल्यास तांदूळ उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते.

राज्यात खरीप आणि रब्बी हंगामात भातशेतीची लागवड करण्यात येते. गोव्यात भातशेती परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे. परंतु आता पारंपरिक शेतीच्या तुलनेत आधुनिक पद्धतीने भात लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे.

तसेच जया, ज्योती सारख्या भाताची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. पारंपरिक बियाणे दिवसेंदिवस कमी होत आहेत. राज्यात २०१९-२० साली १३५५६१ टन तांदळाचे उत्पादन घेण्यात आले होते. तेच २०२३-२४ साली १४२०५६ टन उत्पादन घेण्यात आले.

दोन्ही वर्षातील आकडेवारीची तुलना करता सुमारे ६४९५ टन इतके उत्पादन वाढले आहे. २०२०-२१ आणि २०२२-२३ साल वगळता मागील वर्षांमध्ये उत्पादनात वाढ होत आहे, परंतु मागील पाच वर्षात भात लागवडीखालील क्षेत्रफळात मात्र घट झाली आहे. जी गोव्याच्या कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने अतिशय चिंतेची बाब आहे.

तांदूळ उत्पादन

वर्ष उत्पादन (टन)

२०१९-२० १३५५६१

२०२०-२१ १३१००९

२०२१-२२ १३८०७३

२०२२-२३ १३२५९४

२०२३-२४ १४२०५६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT