Vehicles  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात नवीन वाहनांच्या नोंदणी शुल्कात वाढ

15 वर्षे जुन्या चारचाकी गाडीच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी आता 5,000 रुपये खर्च येईल.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याच्या परिवहन विभागाने नवीन वाहनांच्या नोंदणीचे दर वाढवण्याबरोबरच 15 वर्षे किंवा त्याहून जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाच्या दरातही वाढ केली आहे.
सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Increase in registration fee of new vehicles in Goa)

अधिसूचनेनुसार, 15 वर्षे जुन्या चारचाकी गाडीच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी आता 5,000 रुपये खर्च येईल, तर नवीन गाडीचा (Car) नोंदणी शुल्क 600 रुपये असणार आहे. दुसरीकडे, 15 वर्षे जुन्या दुचाकी वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी `1,000 शुल्क आकारला जाईल, तर नवीन दुचाकीसाठी नोंदणी शुल्क 300 असेल.

तीनचाकी वाहनांसाठी, नोंदणीच्या नूतनीकरणासाठी 2,500 तर नवीन तीनचाकी वाहनाच्या नोंदणीसाठी 600 रुपये भरावे लागणार आहेत. आयात केलेल्या दुचाकी आणि चारचाकीच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी अनुक्रमे 10,000 आणि 40,000 रुपये भरावे लागतील, अशी माहिती आहे. 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून, राज्य सरकारने (Government) सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत नवीन नियमावली लागू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT