Valpoi Electricity Department Dainik Gomantak
गोवा

Sattari News: वारंवार बत्ती गुल; संतप्त ग्रामस्थांनी नेला कार्यालयात मोर्चा

Valpoi Electricity Department: वेळगेवासीयांची वीज कार्यालयावर धडक

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सत्तरीत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. त्‍यामुळे आज मंगळवारी सकाळी वेळगे-सत्तरी येथील संतप्त ग्रामस्थांनी वाळपई वीज कार्यालयात मोर्चा नेऊन तेथील अधिकाऱ्यांना तेथे उपस्‍थित असलेल्‍या कनिष्ठ अभियंत्‍याला जाब विचारला.

सदर अभियंत्‍याने ‘अधिकाऱ्यांशी बोला’ असे सांगितले. त्‍यामुळे ग्रामस्‍थांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांनी फोन घेतला नाही. परिणामी ग्रामस्‍थ आणखी संतप्‍त बनले व तातडीने वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर पूर्ण गावाला घेऊन पुन्‍हा मोर्चा आणू असा इशारा दिला.

प्रकाश गावकर, माजी पंच (वेळूस)

गेल्या सहा महिन्यांपासून वीजसमस्या उग्र बनली आहे. दुपारी आणि रात्रीच्या वेळी कित्येकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्‍यामुळे नीट झोपसुद्धा मिळत नाही. अनेकदा उच्चदाबाच्या वीजेमुळे वीजेवरील उपकरणे निकामी होतात.

शंकर उसपकर, ग्रामस्‍थ

दोन-दोन मिनिटांनी वीज जाते. त्‍यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरही परिणाम होतो. वीज नसली की घरातील कोणतेच काम व्‍यवस्‍थित होत नाही. वीज नाही म्‍हणून आम्हाला वीजबिल येणार नाही का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT