Mormugao constituencies  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील पोलीस यंत्रणेत वाढ

राज्यातील अतिसंवेदनशील मतदार संघातील परिसरात केंद्रीय राखीव दलातर्फे ध्वज मार्च करण्यात आले

दैनिक गोमन्तक

गोव्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणेला गृह विभागातर्फे सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. राज्यातील अतिसंवेदनशील मतदार संघातील परिसरात केंद्रीय राखीव दलातर्फे ध्वज मार्च करण्यात आले.

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात राज्य गृहविभागातर्फे अतिसंवेदनशील मतदार संघात पोलीस यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.

मुरगाव (Mormugao) तालुक्यातील वास्को मतदारसंघातील खारीवाडा भागात शनिवारी निवडणुकीत नियुक्त केलेल्या निरीक्षक डॉ. अर्चना शिवहरी यांनी वास्को पोलिसांबरोबर केंद्रीय राखीव दलाच्या उपस्थितीत ध्वज मार्च करून परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत वास्को पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, पोलीस (police) निरीक्षक शारीफ जाकिस उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक (Assembly Election) 14 फेब्रुवारी रोजी शांततेत पार पाडावी म्हणून राज्य निवडणूक आयोग व गृह विभागातर्फे विविध परिसरात ध्वज मार्च करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी दिली. मुरगाव वास्को मतदार संघात पुरुष व महिला केंद्रीय राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून त्यांच्यामार्फत दररोज विविध भागात ध्वज मार्च करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक हळर्णकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT