स्वातंत्र्यसैनिक नरसिंह पंचवाडकर यांचे निधन

गोवा मुक्तीनंतर तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा ताम्रपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.
Freedom fighter Narasimha Panchwadkar passed away
Freedom fighter Narasimha Panchwadkar passed awayDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : पंचवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक आणि आरोग्य खात्याचे निवृत्त कर्मचारी नरसिंह मिराशी शेट पंचवाडकर (88) यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे 3 च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मडगाव (Margao) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्यामागे वजन व माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक असलेले अरुण पंचवाडकर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पंचवाडकर आणि दोन कन्या व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र अरुण यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

Freedom fighter Narasimha Panchwadkar passed away
मायकल लोबोंनी सांगितले प्रतिज्ञापत्र शपथीचे खरे रहस्य

पंचवाडकर हे आझाद गोमंतक दल या जहाल स्वातंत्र्यसैनिक दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी पंचवाडी भागात राहून पोर्तुगीज (Portuguese) सत्तेविरुद्ध बंड केले होते. गोवा (goa) मुक्तीनंतर तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हस्ते त्यांचा ताम्रपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. शंकर दयाळ शर्मा, अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी या तीन माजी राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.

पंचवाडकर हे समाजिक क्षेत्रातही सक्रिय होते. वंचित स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी बरेच काम केले होते. हल्ली ते पंचवाडी येथेच राहत होते. मागच्या तीन दिवसात त्यांची प्रकृती खालावली होती त्यातच आज पहाटे त्यांचे निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com