Dengue Malaria Arbovirus Dainik Gomantak
गोवा

मडगाव वासियांनो डेंग्यू, मलेरियाची लक्षणे दिसताच या ठिकाणी संपर्क साधा

गोवा आरोग्य केंद्राकडून नागरिकांना सावधानतेच्या सूचना

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गेल्या आठ ते दहा दिवसांत मडगाव (Margao) व परिसरात डेंग्यू (Dengue) व मलेरियाची (Malaria) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पूर्वी मडगावच्या नागरी आरोग्य केंद्राने मडगावात अशा एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचे स्‍पष्‍टीकरण दिले होते. पण, गेल्या काही दिवसांत गोव्यातील इतर भागाप्रमाणे मडगावातही डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत.

यासंदर्भात नागरी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. निक्सन यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी काही रुग्णांची नोंद झाल्याचे सांगितले. आपल्या विभागाचे कर्मचारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत व आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना चालू केल्या आहेत. ज्या परिसरात रुग्ण सापडले, तेथे निर्जंतुकीकरण केले जात आहे. शिवाय रात्रीच्या वेळी धूर सोडण्याचे काम पण चालू केले आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी सावधानता बाळगावी, लक्षणे दिसल्यास केंद्राला कळवावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, सांडपाण्‍याचा योग्‍य निचरा करावा व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन डॉ. निक्सन यानी नागरिकांना केले आहे.

लक्षणे दिसल्‍यास संपर्क साधा

भाजपचे नेते शर्मद रायतुरकर यांनी सांगितले की, कोंबवाड्यावर डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढलेले आहेत. त्यांनी ही बाब मडगाव नगरपालिकेच्‍या मुख्य अधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे. कोणालाही जर डेंग्‍यूबाबत लक्षणे दिसल्यास त्यांनी आपल्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन रायतुरकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT