Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway गाड्यांच्या सेवेत वाढ

मडगाव ते मुंबई सीएसएमटी गाड्यांची मुदत 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंत

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोकण रेल्वे महामंडळाने (Konkan Railway) आपल्या खास रेल्वे सेवेत वाढ केली आहे. मडगाव ते मुंबई सीएसएमटी गाड्यांची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत होती. पण आता या गाड्या 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंत धावणार आहेत. यामध्ये 01112 व 01111या नंबरच्या गाड्यांचा समावेश असणार आहे.

मडगावहुन ही गाडी संध्याकाळी ६ वाजता सुटेल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी पहाटे 5.40 वा. पोहोचेल. तर परतीच्या वेळी ही गाडी रात्री 11.05 वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वा. मडगावात पोहोचेल.

दुसरी मडगाव ते मुंबई व परत 01114-01113 गाडीची सेवा 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. 01114 गाडी मडगावहुन सकाळी 9.15 वा. सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी रात्री 9.45 वा. पोहोचेल.

01113 ही गाडी मुंबईहुन सकाळी 7.15 वाजता सुटेल व मडगावात संध्याकाळी ७ वाजता पोहोचेल. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे महामंडळाने प्रवाशांना कळविले आहे.

700 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण लवकरच

कोकण रेल्वे (Konkan Railway) कॉर्परेशन लिमिटेडतर्फे अंदाजे 1100 कोटी रुपये खर्चून 700 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण लवकरच करण्यात येईल. या कामास यापूर्वीच सुरवात झाली असून गोव्यातील मडगाव स्थानकाजवळच्या कामाने वेग घेतला आहे, अशी माहिती उपमहाप्रबंधक बबन घाटगे यांनी काल दिली.

डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. एरव्ही हे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणार होते, पण कोविड महामारीमुळे उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे हे काम एक वर्ष लांबणीवर पडले, असेही घाटगे यानी सांगितले. मडगाव परिसरात कॉंक्रीट टाकून खांब उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावरून काही विशेष गाड्या व मालवाहू गाड्या गवळता इतर प्रवासी सेवा बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

SCROLL FOR NEXT