Tuyem Hospiatl Building Dainik Gomantak
गोवा

Tuyem News: तुयेतील ३२ कोटींचे इस्पितळ बनले आहे कोंडवाडा

Tuyem Hospital: इमारत बांधून आठ वर्षे पूर्ण, तरीही वापर नाही; मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा

गोमन्तक डिजिटल टीम

तुये सामुदायिक आरोग्य केंद्राच्या बाजूला तब्बल ३२ कोटी रुपये खर्चून १०० खाटांचे इस्पितळ उभारले खरे; परंतु या इमारतीला आठ वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप ती वापरात आणलेली नाही. त्यामुळे सध्या ही इमारत कोंडवाडा बनली आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी निश्‍चित तोडगा काढावा, अशी मागणी तुयेचे माजी सरपंच नीलेश कानोळकर यांनी केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ३२ कोटी रुपये खर्च करून तुये सामुदायिक आरोग्य केंद्राच्या बाजूला सुसज्ज असे १०० खाटांचे हॉस्पिटल उभारले होते. त्या इमारतीला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु अजूनपर्यंत हे हॉस्पिटल सुरू झालेले नाही.

गेल्या वर्षी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात हे हॉस्पिटल डिसेंबर २०२३ पूर्वी सुरू होईल, असा शब्द दिला होता. परंतु आजपर्यंत हे हॉस्पिटल सुरू झालेले नाही, असे कानोळकर म्हणाले.

डायलेसिस युनिटचा देखावा

२०२२ सालच्या विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या हॉस्पिटलमध्ये डायलेसिस युनिटचे उदघाटन थाटात केले होते आणि लवकरच हॉस्पिटल सुरू करण्याची ग्वाही दिली होती; परंतु त्या प्रकाराला दोन वर्षे उलटली तरी अद्याप हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा पुरविलेल्या नाहीत.

मोकाट गुरांचे आश्रयस्थान

या हॉस्पिटलच्या परिसरात केरकचरा साचला असून झाडेझुडपे वाढली आहेत. मोकाट जनावरे या हॉस्पिटलच्या इमारतीत येऊन घाण करतात. सध्या हे मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. या हॉस्पिटलमध्ये फर्निचर व इतर सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.

वृक्षारोपणास परवानगी द्या!

या हॉस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. अस्वच्छता दिसत आहे. सरकारने या हॉस्पिटल परिसरात एखाद्या संस्थेला झाडे लावण्यासाठी, वन महोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी. अन्यथा आजी माजी सरपंच-पंच एकत्र येऊन वन महोत्सव साजरा करू, असे मत माजी सरपंच ॲड. सीताराम परब यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT