Income Tax Raid in Goa Dainik Gomantak
गोवा

Income Tax Raid in Goa : मडगावात दोन बिल्डरांच्या घरावर आयकरची धाड

कारवाईत कुणाचा व्यत्यय येऊ नये यासाठी दोन्ही बिल्डरांचा घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सुशांत कुंकळयेकर

Income Tax Raid in Goa : मडगाव पालिकेचे माजी नगरसेवक कुदबुद्दीन बागेवाडी आणि त्यांचा रियल इस्टेट व्यवसायातील भागीदार अल्ताफ सय्यद यांच्या घरावर आयकर खात्याने धाड टाकली आहे. आज बुधवारी सकाळी आयकर विभागाने गोव्यातील बिल्डरवर धाडी घातल्याने संपूर्ण मडगाव येथे तो चर्चेचा विषय बनला आहे. दुपारी उशिरापर्यंत आयकर खात्याची ही कारवाई चालू होती.

आयकर विभागाने आज बुधवारी सकाळी ही धडक कारवाई केली. मनोविकास शाळेजवळ असलेल्या अल्ताफ सय्यद तसेच घोघळ हाउसिंग बोर्ड येथे असलेल्या बागेवाडी यांच्या घरावर ही धाड घालण्यात आली. या कारवाईत कुणाचा व्यत्यय येऊ नये यासाठी दोन्ही बिल्डरांचा घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ही कारवाई आज सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली होती. दुपारपर्यंत कारवाई चालूच होती. ही कारवाई नेमकी कशासाठी केली गेली त्याची माहिती मिळाली नाही. मात्र आयकर खात्याच्या धाडीमुळे गोव्यातील अनेक बिल्डर लोकांचं मात्र धाबं दणाणलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वाळूमाफियांना बसणार चाप! जनतेसाठी हेल्पलाईन जाहीर; तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक जाणून घ्या..

Horoscope: बुधादित्य योग! 'या' राशींना होणार मोठा फायदा; धन प्राप्तीसाठी उत्तम वेळ

Goa Politics: मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री सावंत कुणाची वर्णी लावणार? संपूर्ण राज्‍याचे लक्ष; मायकल संकल्‍प यांच्‍या आशा पल्लवित

'या गुन्ह्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण झालीय, जेनिटोला जामीन देऊ नका'; 'रामा'ची ठाम भूमिका

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

SCROLL FOR NEXT