Goa Inquisition History Dainik Gomantak
गोवा

Goa Inquisition: गोव्यात शालेय अभ्यासक्रमात 'इन्क्विझिशन'चा इतिहास समाविष्ट करा; हिंदू जनजागृती समिती

Goa Inquisition History: गोव्यात 24 ते 30 जून 2024 या कालावधीत 12 व्या ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन.

Pramod Yadav

Goa Inquisition History

गोव्यातील 'इन्क्विझिशन'चा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने गोवा सरकारकडे केली आहे. उत्तरप्रदेशातील योगी सरकार राममंदिराचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करु शकते तर गोव्यात का नाही? असा सवाल देखील समितीने उपस्थित केला आहे.

गोव्यात 24 ते 30 जून 2024 या कालावधीत होणार्‍या 12 व्या ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत दक्षिण गोवा राज्य समन्वयक सत्यविजय नाईक आणि अधिवक्ता शैलेंद्र नाईक बोलत होते.

गोव्यातील भव्य आणि प्राचीन मंदिरांचा इतिहास, पोर्तुगीज काळात झालेला मंदिरांचा विध्वंस, ‘इन्क्विझिशन’द्वारे झालेले अत्याचार, गोमंतकियांनी मंदिरे आणि संस्कृती रक्षणासाठी दिलेला लढा, हा इतिहास का शिकवला जाऊ शकत नाही? गोमंतकाचा सत्य इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जावा, अशी राज्य सरकारकडे मागणी आहे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

पंतप्रधान मोदींनी नुकतेच नालंदा येथे प्राचीन विश्वविद्यालयाच्या जवळ नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. उत्तरप्रदेशातील योगी सरकारने राममंदिराचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला तसाच गोव्यात देखील इन्क्विझिशनचा इतिहास शिकवला जावा, अशी मागणी समितीने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LSG New Logo: लखनऊ सुपर जायंट्सचा 'नवा अवतार'! आयपीएल 2026 पूर्वी लोगोमध्ये मोठा बदल; पाहा PHOTO

'83 वर्षे वय, पण स्वॅग तोच'! कल्की 2 चे शूटिंग सुरु; महानायक अमिताभ बच्चननी शेअर केला कमल हसनसोबत खास Photo

Iran Helicopter Crash: इराणमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर अणुकेंद्राजवळ कोसळलं! पायलटसह 4 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

West Indies vs Zimbabwe: वानखेडेवर षटकारांचं पाऊस! विंडीज-झिम्बाब्वे सामन्यात मोडला 12 वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; पहिल्यांदाच घडला 'असा' चमत्कार VIDEO

Vyatipat Yog: होळीनंतर 3 राशींना 'व्यतिपात' योगाचा फटका! सूर्य-चंद्राची युती ठरणार भारी; आर्थिक नुकसानीचे संकेत

SCROLL FOR NEXT