IFFI 2025 News Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कारप्राप्त कोंकणी चित्रपट ‘आसेसांव’ का दुर्लक्षित? इफ्फी समावेशाची कलावंतांची मागणी

Konkani short film Ancessao: शेटगावकर यांनी गोवा सरकार व गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) यांच्यावर ‘गोवा फिल्म फायनान्स स्कीम’अंतर्गत निधीचे वितरण न केल्याबद्दल तीव्र टीका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आसेसांव या लघू चित्रपटाचा इफ्फी-२०२५ मध्ये समावेश करावा आणि हा महोत्सव खऱ्या अर्थाने गोव्याच्या सर्जनशीलतेचा उत्सव बनवावा, अशी मागणी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर, चित्रपटकलाकार साईश पै पाणंदीकर, गोवा मनोरंजन संस्थेचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत केली.

शेटगावकर यांनी गोवा सरकार व गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) यांच्यावर ‘गोवा फिल्म फायनान्स स्कीम’अंतर्गत निधीचे वितरण न केल्याबद्दल तीव्र टीका केली. ‘प्रत्येक ‘इफ्फी’पूर्वी सरकार मोठमोठी आश्वासने देते, परंतु प्रत्यक्षात निधी वितरणात विलंब होतो, ज्यामुळे अनेक गोमंतकीय चित्रपट अर्धवट अवस्थेत थांबतात,’ असे ते म्हणाले.

पाणंदीकर यांनी एनएफडीसीच्या निवडप्रक्रियेवर अन्यायकारक धोरणाचा आरोप केला. त्यांनी निदर्शनास आणले की, ‘क्लावडिया’सारखा चित्रपट जो कुठेही प्रदर्शित झालेला नाही आणि भारतीय पॅनोरामा विभागात निवडला गेला नाही, तो ‘स्पेशल प्रेझेंटेशन’ म्हणून दाखवला जाणार आहे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन पुरस्कारप्राप्त कोंकणी चित्रपट ‘आसेसांव’ का दुर्लक्षित राहावा? त्यांनी मागणी केली की, आसेंसांव चित्रपटाचा समावेश इफ्फी-२०२५ मध्ये करावा.

काकोडे म्हणाले, ‘इफ्फीचा ब्रॅण्ड व्हॅल्यू आता कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची उपस्थिती आणि प्रायोजकांची संख्या घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. आपलेच गोमंतकीय चित्रपट व चित्रपट कलाकार यांचा सन्मान न करणारे राज्य जगाला काय दाखवणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्व. के.वैकुंठ यांचा गौरव व्हावा!

भारतीय चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य गोमंतकीय सिनेमाटोग्राफर स्व. के. वैकुंठ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करावा आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, अशी मागणी फिल्म फ्रॅटर्निटी ऑफ गोवा ने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Industry: कोकणी सिनेमा बनवायचा झाल्यास 'कोटी' रुपये गोव्यातील निर्माता कोठून आणेल?

IFFI Golden Peacock Award: कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक' अवॉर्ड? उत्सुकता शिगेला..

Karapur Sarvona: ..आणि 'तो' मीटिंगमधून पळाला! कारापूर-सर्वण पंचायतीत गोंधळ; 2 महिला पंचसदस्‍यांना शिवीगाळामुळे गदारोळ

Goa Crime: सावत्र बाप निघाला 'नराधम'! 20 महिने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ; दिली जीवे मारण्याची धमकी

Camurlim: ..परवाना नाही, तरीही झाडे तोडली! कामुर्ली ग्रामसभा तापली; सरपंचांचा FIRचा इशारा

SCROLL FOR NEXT