Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: नागाळीत चोरट्यांचा 'सुळसुळाट', दोनापावलातूनही सोन्याचे दागिने लंपास; पोलिसांच्या दुर्लक्षाचा होतोय आरोप

Goa Crime News: गेल्या आठवड्यापासून नागाळी हिल्स आणि दोनापावला परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: गेल्या आठवड्यापासून नागाळी हिल्स आणि दोनापावला परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे, तर एका बंगल्यात कुटुंब झोपेत असताना चोरी करून ते पसार झाले. या घटनांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. निवडणूक कामात व्यस्त असलेल्या पोलिसांचेही रात्रीच्या गस्तीवर दुर्लक्ष होत असल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी या चोऱ्या केल्या आहेत. रविवारी (२८ एप्रिल) रात्री नागाळी हिल्स येथील एकमजली बंगल्यामध्ये चोरट्याने प्रवेश करून सुमारे १ लाख ९० हजाराचे सोन्याचे व डायमंडचे दागिने संपास करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन डायमंड अंगठ्या, दोन ब्रेसलेट्स व दोन नेकलेस याचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंगल्यामध्ये चोरी झाली तेव्हा त्यातील कुटुंब झोपेत होते. या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बाथरूमची खिडकीला ग्रिल्स नव्हते. त्याला फक्त फोल्डिंगच्या काचा होत्या. या चोरट्याने वर चढून या काचा काढल्या व त्यानंतर आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील बेडरूममध्ये असलेल्या बॅग्स व कपाटेमधील किंमती दागिने लंपास केले. या बेडरूमच्या बाजूला असलेल्या बेडरूममध्ये तसेच तळमजल्यावरील खोल्यामध्ये कुटुंबातील सदस्य झोपलेले होते, मात्र या सर्वांनाच सकाळी उठल्यानंतर त्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पंचनामा करण्यात आला.

श्‍वानपथक तसेच हस्त ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरटा बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये उडी मारून आला व त्यानंतर त्याने ही चोरी केली. या चोरीचा छडा लावण्यासाठी पणजी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास सुरू केला आहे. त्यातून चोरट्याचा शोध लागला असून त्याची ओळख पटवण्यासाठी अडचणी येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या आठवड्यात ताळगाव पठारावरील काही बंद असलेले फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. त्यातील तीन प्रकरणामध्ये ते सफल ठरले, मात्र त्यांच्या हाती रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू लागल्या नाहीत. या प्रकरणी संबंधितांनी पोलिसांत तक्रार दिली असली तरी त्यात किरकोळ वस्तू चोरीला गेल्याने काहींनी त्या नोंदवण्याबाबत गंभीरता दाखवली नाही, मात्र याप्रकरणांबाबतही तपास सुरू आहे. दरम्यान या चोऱ्या सुरू असतानाच नागाळी हिल्स येथील अलिशान बंगल्यात चोरी झाल्याने पोलिसांची झोप उडाली आहे.

चोरट्यांचा शोध सुरू

चेहऱ्यावर कपडा बांधून रात्री रस्त्यावरून फिरणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या व्यक्तीने हातात मोजे तसेच पायामध्ये सॉक्स घातलेला दिसत आहे. नागाळी हिल्स येथे असलेल्या बंगल्यांच्या परिसरात तो चालताना दिसतो, त्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT