Minister Anurag Thakur at Iffi Goa 2023 PIB
गोवा

परदेशी चित्रपट निर्मिती संस्थासाठी मंत्री अनुराग ठाकूर यांची इफ्फीत मोठी घोषणा, निधीत केली भरघोस वाढ

भारताशी संबंधीत महत्त्वाचा आशय असेल अशा चित्रपटांसाठी अतिरिक्त 5 टक्के निधी

Pramod Yadav

54th IFFI Goa 2023: भारतात सिनेमाचं चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत वाढ करून ती चित्रिकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या 40 टक्के इतकी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली आहे.

गोव्यात पणजी इथे होत असलेल्या  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.

यासाठीची यापूर्वीची मर्यादा वाढवून ती 30 कोटी रुपये (3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त) केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी, प्रत्येक प्रकल्पासाठीच्या प्रोत्साहनाची मर्यादा केवळ 2.5 कोटी रुपये होती. यासोबतच ज्या सिनेमांमध्ये भारताशी संबंधीत महत्त्वाचा आशय [Significant Indian Content (SIC)] असेल अशा चित्रपटांसाठी अतिरिक्त 5 टक्के निधी बोनस म्हणून दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.

"भारताचे आकारमान आणि इथली अफाट क्षमता लक्षात घेता मध्यम आणि मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्पांना देशात आकर्षित करण्यासाठी अधिक सवलत देण्याची गरज होती. चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीत केलेली वाढ कलात्मक अभिव्यक्तीप्रती भारताच्या वचनबद्धतेचा आणि पाठिंब्याचा दाखला आहे," असे ठाकूर म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदाच्या इफ्फी (IFFI) मध्ये पुरस्कारांच्या श्रेणीत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) या नवीन श्रेणीची घोषणा केली. "महोत्सवातील नवीन गोष्टींवर प्रकाश टाकत ते म्हणाले, भारतातील आशय संपन्न साहित्य निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी रोजगार निर्मिती आणि नवोन्मेष, यासाठी दिलेलं योगदान लक्षात घेत, त्यांच्या परिवर्तनशील भूमिकेला इफ्फी मध्ये मान्यता दिली जाईल आणि त्यांचा गौरव केला जाईल.”  

यंदाच्या इफ्फीमध्ये 40 महिला चित्रपट निर्मात्यांचे उल्लेखनीय चित्रपट दाखवले जातील. त्यांची प्रतिभा, सृजनशीलता आणि असामान्य दृष्टीकोन, या महोत्सवात विविध गटांचे आणि आशयाचे प्रतिनिधित्व करेल, असे  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT