Chaturthi Bazaar Dainik Gomantak
गोवा

होंड्यात फुलला स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार

गोवा सरकारचा सुस्त्य उपक्रम

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: राज्य सरकारने सुरू केलेल्या स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार संकल्पनेच्या माध्यमातून होंडा या मध्यवर्ती ठिकाणी चतुर्थी पुर्वी खरेदी करण्यासाठी येथिल होंडा बसस्थानकाच्या परिसरात स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार सुरू करण्यात आला आहे. सदर बाजाराचे उद्घाटन फोंडा येथील उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

(Inauguration of market at Honda through 'Chaturthi Bazaar Concept')

या प्रसंगी केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, होंडा पंचायतीचे प्रशासक राजेश दळवी, होंडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य निलेश गावस, खाण संचालनालय चे शामसुंदर सावंत, होडा पंचायत सचिव मुला वरक, तसेच विविध भागातील स्वयंपूर्ण मित्र आदि मान्यवर उपस्थित होते.

या ठिकाणी सुरू केलेल्या स्वयंपूर्ण चतुर्थी बाजारामुळे या भागातील महिला मंडळ, सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, त्यामुळे पहिल्याच दिवशी या उपक्रमात सुमारे 20 गटांनी आपला सहभाग नोंदवला, त्याचबरोबर या बाजारामूळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

हा बाजार 30 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून सरकारने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, कारण सहभागी होणाऱ्या होतकरु महिलांनी एकत्र येत काही वस्तू बनवल्या आहेत. या वस्तू बाजारात विकल्या गेल्यास याचा परिणाम होतकरु गट आणखी बळकट होण्यास होणार आहे असे होंडा पंचायतीचे प्रशासक राजेश दळवी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

SCROLL FOR NEXT