Gomantak Tanishka Dainik Gomantak
गोवा

Gomantak Tanishka : गोमन्तक तनिष्का व्यासपीठाच्या ‘श्रावण उत्सवा’चे आज उद्‍घाटन

महिलांमधील कलागुणांना संधी मिळावी याउद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Tanishka : श्रावण महिना आनंदाचा, उत्साहाचा मानला जातो. महिलांमधील उत्साहाला वाट करून देण्यासाठी गोमन्तक तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून ‘श्रावण उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्‍घाटन शुक्रवारी (26 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता पणजीतील इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात होणार आहे. तसेच रविवारी मडगाव येथील महिला नूतन विद्यालयात दक्षिण गोव्यातील महिलांसाठी ‘श्रावण उत्सव’ होणार आहे.

पणजीतील उद्‍घाटन सामाजिक कार्यकर्त्या सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते होईल. महिलांमधील कलागुणांना संधी मिळावी याउद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्याची ‘फिश थाळी’ सर्वत्र प्रसिद्ध असली तरी इथे घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट शाकाहारी पदार्थ बनवले जातात. घराघरात केल्या जाणाऱ्या पदार्थांची सर्वांना ओळख व्हावी म्हणून ‘श्रावण थाळीची’ स्पर्धा ठेवण्यात आली आहे. फुलांची फाती, श्रावण थाळीचे प्रदर्शन संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत सर्वांसाठी उपलब्ध असेल.

महिलांच्या कलागुणांना वाव

श्रावण हा फुलांचा महिना शिवाय महिलांसाठी साजशृंगार करण्याचे दिवस. महिलांनी  एकत्र येऊन श्रावण साजरा करावा हा देखील या उत्सवामागील उद्देश आहे. याच अनुषंगाने तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून या काळात उमलणाऱ्या वेगवेगळ्या फुलांची फाती (वेणी), सुंदरशी मेंदीची स्पर्धा आयोजित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मी त्यांच्यासमोर सामान्य नेता", आरोग्यमंत्री राणेंचे आवडते मुख्यमंत्री कोण? Watch Video

IPL 2025: 13 कोटींचा खेळाडू 'यलो आर्मी'तून बाहेर! जडेजापाठोपाठ CSKचा आणखी एका स्टारला रामराम?

Ravindra Jadeja Record: रवींद्र जडेजानं रचला इतिहास, 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरला मागे टाकत केली 'ही' मोठी कामगिरी

सांताक्रूझ अपघातानंतर वीज विभागाची कारवाई; EE काशीनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली मोहीम!

भारतात DPDP कायदा लागू, Social Mediaवरील नियम अधिक कठोर होणार, काय बदल होतील? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT