Panjim : गणेश मूर्ती विसर्जनस्थळाची पणजीच्या महापौरांकडून पाहणी

11 ठिकाणी पाहणी करत महापौरांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
Rohit Monserrate Visits at Ganesh Immersion places in panjim
Rohit Monserrate Visits at Ganesh Immersion places in panjim

पणजी, ता. २५ (प्रतिनिधी) ः पणजी महापालिका क्षेत्रात ११ ठिकाणी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांचे गणेश विसर्जन केले जाते. त्या जागांवर उपलब्ध करावयाच्या सुविधा आणि सध्याची तेथील स्थितीची पाहणी महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक यांनी नुकतीच केली.

महापालिका कार्यक्षेत्रात विसर्जन करण्याच्या असणाऱ्या ठिकाणांच्या काही शेडची दुरुस्ती करायची असल्याचेही दिसून आले. महापालिका अभियंत्यांना कोणकोणती कामे करावयाची आहेत, ती करून घ्यावीत अशा सूचनाही महापौर मोन्सेरात यांनी दिल्या. पणजी शहरात करंजाळे, मिरामार, फेरीबोट, जलस्रोत खात्याच्या जेटीकडे, रूअ दी ओरेंम खाडीवर जुन्या सार्वजनिक बांधकाम खात्याजवळ, त्याशिवाय नेवगी नगर येथील चार खांबाकडे अशा ठिकाणी गणपतींचे विसर्जन केले जाते.

भाविकांची गैरसोय टाळणार

विसर्जन स्थळांचे नियोजन करण्यात येणाऱ्या अकरापैकी चार ठिकाणे पणजी शहरात आहेत, तर इतर सात ठिकाणे रायबंदर परिसरात आहेत. त्याठिकाणी जाऊन सुविधांची पाहणी मोन्सेरात यांनी केली. तेथे निर्माल्य टाकण्यासाठी भाविकांकरिता सोय करणे, महापालिकेचे कर्मचारी त्यारात्री उशिरापर्यंत नियुक्त करणे, त्याशिवाय विद्युत रोषणाई करणे, आवश्‍यक त्या ठिकाणी बोटीची सोय करणे अशा सर्व बाबी अंमलात आणण्यात येणार असल्याचे मोन्सेरात म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com