पर्यटनाच्या दृष्टिने गोवा महाग होत चालले आहे. टॅक्सीचे दर वाढले, हॉटेल्सचे रुम भाडे महाग झाले, एअरलायन्सची तिकटं महाग झाली. सगळ्याच बाजूंनी गोवा महाग होत चालला आहे.
अशा परिस्थित गोव्यात यायचं की नाही याचा पर्यटक विचार करीत असल्याचे विधान औद्योगिक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केलंय. मोपा विमानतळावरील ब्लू कॅप टॅक्सी काउंटरच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री गुदिन्हो बोलत होते.
मोपा विमानतळावरील ब्ल्यू कॅप प्रिपेड टॅक्सी संघटनेच्या काउंटरच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गुदिन्हो यांच्यासह आमदार प्रवीण आर्लेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
जर एखाद्या स्थानिक उद्योजकाला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यवसाय मिळत नसेल तर त्यांनी माझ्याकडे तक्रार करावी. मी संबंधितांसोबत बैठक घेण्यास तयार आहे.
मोपा विमानतळावर स्थानिक उद्योजकांना संधी मिळायला हवी असल्याचे ते म्हणाले. मोपा विमानतळ होण्यासाठी इथल्या स्थानिकांचे मोठे योगदान आहे.
विमानतळ होण्यासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी प्राधिकरणाकडे दिल्या असून त्यांनी एका अर्थाने जमिनींचा त्याग केला आहे.
त्यामुळे या स्थानिकांच्या मुलांना त्यांच्या कौशल्याच्या आणोनि शैक्षणिक अहर्तेच्या आधारे विमानतळावर नोकरी मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या गोव्यात भाजीपाल्यासह मासेही महाग झाले असून याचा थेट परिणाम गोव्यातील जीवनमानावर पडत आहे. परिणामी गोव्यात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचे दरही कमालीचे वाढत चालले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.