Ayushman Bhav Dainik Gomantak
गोवा

Ayushman Bhav: ‘आयुष्मान भव’ उपक्रमाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Ayushman Bhav: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी ‘आयुष्मान भव’ उपक्रमाचे आभासी पद्धतीने उद्‍घाटन केले.

दैनिक गोमन्तक

Ayushman Bhav: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी ‘आयुष्मान भव’ उपक्रमाचे आभासी पद्धतीने उद्‍घाटन केले. या उपक्रमाचा उद्देश भारत सरकारच्या आरोग्य सेवांचा देशाच्या कानाकोपऱ्यात वितरण सुनिश्चित करणे हा आहे. 

उपक्रमाच्या शुभारंभासोबतच राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘आयुष्मान भव’ पोर्टलचेही यावेळी अनावरण केले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्यासह मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. एस. पी. सिंह बाघेल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री; आणि डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री कार्यक्रमास उपस्थित होत्या.

बुधवारी दुपारी आरोग्य सेवा संचालनालय, गोवा आयोजित ‘आयुष्मान भव’चे राज्यस्तरीय प्रक्षेपण इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा, पणजी येथे झाले. आयएएस, आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा यांनी गोव्याच्या आरोग्य सेवा क्षेत्रात सतत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि सुविधा देण्यासाठी निर्धारित लक्ष्य साध्य करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला.

आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी नागरिकांना स्वत:ची नावनोंदणी करून आयुष्मान भव योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले. या मोहिमेच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत आरोग्याशी संबंधित विविध उपक्रमांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली आणि लाभार्थ्यांना एबीएचए कार्ड आणि पीएमजीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा नाईक व डॉ. योगेश पोतदार यांनी केले, तर डॉ. रुपा नाईक यांनी आभार मानले.

17 सप्टेंबरपाून सेवा पंधरवडा

‘आयुष्मान भव’ मोहीम १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ही मोहीम सुरू होईल आणि २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त या उपक्रमाचा समारोप होईल. देशातील खेडेगावातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे तत्त्व अधोरेखित करणारा हा काळ सेवा पंधवडा म्हणून ओळखला जाईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरवात विविध आरोग्य सेवा योजनांच्या जागृतीसाठी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT