Election Winds in Mormugao Dainik Gomantak
गोवा

मुरगावात विजय कुणाच्या पारड्यात?

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी मुरगाव मतदारसंघामध्ये उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Mormugao: विविध प्रकरणांनी गाजत असलेल्या मुरगाव मतदारसंघातून कोण विजयी होतो, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी मुरगाव मतदारसंघामध्ये उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. या मतदार संघातील तथाकथित नेत्यांची भाजपातून काँग्रेसमध्ये (Congress) व काँग्रेसमधून भाजपामध्ये (BJP) ये-जा सुरू झाली आहे. 'हा आला म्हणून शक्ती वाढली' तसेच 'तो गेला म्हणून 'काहीच फरक पडत नाही' अशी विधाने ऐकू येत आहेत.

कोण कधी पलटी मारील हे सांगता येत नसल्याने भाजप व काँग्रेसवाले सध्या मोठी सावधगिरी बाळगत आहे. विकास कामे, रोजगार, नैतिकता अनैतिकता, प्रदूषण आदी विविध प्रश्नांवर समाज माध्यमावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

त्यामुळे मतदारांची करमणूकही होत आहे. मुरगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार मिलिंद नाईक व गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील (Goa Assembly Election) त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांच्यामध्ये तिसऱ्यांदा लढत होणार आहे. मिलिंद नाईक हे चौथ्यांदा विजयी होण्यासाठी तर संकल्प आमोणकर हे पराभवाची

हॅट्रीक खंडित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोन्ही बाजूनी विजयाचा दावा करण्यात येत आहे.तर अपक्ष उमेदवार निलेश नावेलकर आपल्या विजयाचे रणसिंग फुंकले आहे.त्यामुळे विरोधकांना धास्ती भरली आहे.

मुरगाव मतदारसंघांमध्ये लोकांना पाहिजे ती विकासकामे झाली नसल्याचा दावा कांग्रेस करत आहे तर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचा दावा भाजप करत आहे. भाजपचे मिलिद नाईक, काँग्रेसचे संकल्प आमोणकर, गोवा तृणमूल काॅग्रेसचे जयेश शेटगावकर, 'आप'चे परशुराम सोनुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख महंमद, 'आरजी'चे परेश तोरस्कर, अपक्ष उमेदवार नीलेश नावेलकर, अपक्ष इनायतुल्ला शेख, या आठ उमेदवारांचा समावेश आहे. आमोणकर यांच्या पॅनेलातून गेली पालिका निवडणूक लढविणारे नीलेश नावेलकर हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत तर शेखर खडपकर यांनी मिलिंद नाईक यांची साथ धरली आहे. जयेश शेरगावकर हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत.

त्यामुळे आमोणकर यांच्या मतांवर काही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, मुरगाव मतदार संघामध्ये मिलिंद नाईक व संकल्प आमोणकर यांच्यामध्येच लढत असल्याने इतर उमेदवारांचा मुरगाव मतदारसंघातून 1963 साली युनायटेड गोवन्स पार्टी (सिक्केरा गट) च्या उर्मिला मास्कारेन्हास, 1967 साली मगोचे गजानन पाटील, 1972 साली मगोचे वसंतराव जोशी जिंकले होते. त्यानंतर चार वेळा काँग्रेसचे शेख हसन जिंकले होते. ते एकवेळा सर्व काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यामुळे पाचवेळा शेख हसन विजयी झाले होते. जॉन मान्युअल वाझ हे अपक्ष तर त्यांचे पुत्र कार्ल वाझ हे काँग्रेसच्या तिकीटावर जिंकले होते. त्यानंतर 2007 पासून मिलिंद नाईक हे मुरगाव मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

यंदाची निवडणुकही मिलिंद नाईक (Milind Naik) विरुध्द संकल्प आमोणकरअशीच होणार आहे. या निवडणुकीत उतरलेले परशुराम सोनुर्लेकर यांनी गत विधानसभा निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेख महंमद तसेच गोवा तृणमूल उमेदवार जयेश शेटगावकर यांनी पालिका निवडणूक लढविल परंतु ते पराभूत झाले होते. निवडणुकीत पराभूत झाल्यावरीही आमोणकर हे गप्प बसले नाहीत, यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठविला होता. अलीकडे त्यांनी कथित लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणले त्या प्रकरणाचा कोणाला किती लाभ होईल हे निकालानंतर समजेल.

सन 2017 च्या विधानसभा निवडणूक भाजप व काँग्रेसमध्ये अतिशय चुरशीची झाली होती. त्यामध्ये मिलिंद नाईक यांना 8466 तर आमोणकर यांना 8326 मते मिळाली होती. मिलिंद नाईक हे अवघ्या 140 मतांनी जिंकले होते.या मतदारसंघामध्ये आरोग्य विषयक सुविधा नसल्याचे प्रत्येक उमेदवारांच्या लक्षात आले आहे. मिलिंद नाईक, संकल्प आमोणकर तसेच निलेश नावेलकर यांनी इस्पितळ उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्पितळाची कल्पना आपली असल्याचा दावा विरोधक करत आहेत.निलेश नावेलकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात इस्पितळाची, पाण्याची तसेच मतदारसंघात भासत असलेल्या इतर समस्या मांडल्या आहेत. निवडून आल्यानंतर या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे नमुद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT