Need for speed breaker in front of Dr Hedgewar School Dainik Gomantak
गोवा

वाळपईतील डॉ. हेडगेवार विद्यालयासमोर गतिरोधकाची गरज

वाहनांच्या वेगाला नियंत्रण येण्यासाठी या ठिकाणा गतिरोधक आवश्यक

दैनिक गोमन्तक

वाळपई: येथील वाळपई - नगरगाव या मुख्य मार्गावर नवीनच सुरू झालेल्या डॉ. केशव हेडगेवार विद्यालयासमोरील रस्त्यावर आता रस्ता विभागाने गतिरोधक घालण्याची नितांत गरज आहे. हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये - जा सुरू असते. अशावेळी भरधाव वेगाने गाडी चालविणे नित्याचेच बनले आहे. या विद्यालयात जाण्यासाठी पालक वर्ग मुलांना घेऊन रस्ता ओलांडत असतात.

त्यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहनांच्या वेगाला नियंत्रण येण्यासाठी या ठिकाणा गतिरोधक आवश्यक बनला आहे. मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत रस्ता विभागाने तत्काळ कार्यवाही करीत या विद्यालयासमोरील रस्त्यावर दोन्ही ठिकाणी गतिरोधक घालण्याची प्रक्रिया केली पाहीजे. ज्या ठिकाणी शाळा असतात, त्या ठिकाणी गतिरोधकांची बांधणी जरुरीची आहे. त्यामुळे सरकारच्या वाळपई रस्ता बांधकाम विभागाने त्वरित हालचाली करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT