Ponda And Sanquelim Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Ponda - Sanquelim Municipal Election 2023: आज माघार कोणाची? अनेकांचे लागले लक्ष

पालिका निवडणुका: 108 अर्ज ठरले ग्राह्य

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda - Sanquelim Municipal Election 2023: फोंडा आणि साखळी पालिकांच्या निवडणुकीच्या आजच्या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले.

यातील काही उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेले अतिरिक्त दहा अर्ज छाननीच्या वेळी बाजूला ठेवले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या गुरुवारी दुपारपर्यंत अंतिम मुदत आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात प्रतिष्ठेच्या बनलेल्या साखळी पालिकेच्या 12 प्रभागांसाठी सर्व 56 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले असून येथे दाखल करण्यात आलेला एक अतिरिक्त अर्ज बाजूला काढण्यात आला आहे.

प्रभाग 1 आणि 2 मध्ये सर्वाधिक 8 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. तर प्रभाग क्रमांक 3 आणि 11 मध्ये सर्वांत कमी 2 उमेदवार उरले असून त्यांच्यात सरळ लढत होईल.

महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग2 आणि 6 प्रत्येकी 8 आणि 6 उमेदवारी अर्ज आले आहेत. तर ओबीसीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये 3 उमेदवारी अर्ज आले आहेत.

काँग्रेस पुरस्कृत धर्मेश सगलानी यांचा प्रभाग 9 तर इशा सगलानी यांचा प्रभाग 2 मधील अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. प्रवीण ब्लेगन आणि भाग्यश्री ब्लेगन यांचे अर्जही ग्राह्य धरण्यात आले आहेत.

सरळ लढती

कृषिमंत्री रवी नाईक यांचा दबदबा असलेल्या फोंडा पालिकेत सर्व 52 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले. येथे अनेक उमेदवारांनी दाखल केलेले अतिरिक्त 9 उमेदवारी अर्ज बाजूला काढण्यात आले.

प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वाधिक 6 उमेदवारी अर्ज असून प्रभाग क्रमांक 2, 7, 13 आणि 15 मध्ये सर्वांत कमी 2 उमेदवार असून त्यांच्यात सरळ लढतीची अपेक्षा आहे.

रॉय व रितेश नाईक यांचे अर्ज ग्राह्य:-

फोंडा पालिकेत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग 3 आणि 15 मध्ये प्रत्येकी 4 आणि 2 उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. प्रभाग 1 मधून रॉय नाईक तर प्रभाग ५ मधून रितेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. तर प्रभाग 7 मधून विश्वनाथ दळवी उमेदवार असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT