Pramod Sawant Goa CM Dainik Gomantak
गोवा

नवं सरकार नवा कार्यकाळ! गोवा सरकारचा नोकऱ्यांवरती भर

सरकारी योजना राबवून समाजकल्याणाचे काम सुरू ठेवणार; डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन

दैनिक गोमन्तक

घडामोडींनी भरलेल्या राजकारणानंतर अखेर 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने बहुमताने पुन्हा एकदा गोव्याच्या राजकारणात आपले वर्चस्व दाखवून दिले. मात्र असे असूनही भाजप सत्ता स्थापन करण्यामध्ये विलंब करत असल्यामुळे गोव्यात विविध चर्चांना उधाण आले होते. (In the new term of the government Goa government will focus on job creation)

अखेर 21 मार्चला भाजपचे केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल झाले आणि या बैठकीमध्ये भाजप विधिमंडळ गटनेता म्हणून प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची अखेर निवड करण्यात आली असून पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आले. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या काळापासून भाजपने गोव्यामध्ये अनेक सरकारी योजना (Government scheme) राबवल्या आहेत. त्यांनी सुरू केलेले समाजकल्याणाचे काम मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढे सुरु ठेवले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गोव्यात त्या सरकारी योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन गोवेकरांना दिले आहे.

उद्या 28 मार्चला प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून इतर आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या सरकारच्या नव्या कार्यकाळामध्ये गोवा सरकार स्वयंपूर्ण गोवा 2.0, सरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण महिला या मोहिमांसह गोव्यातील तरुणांसाठी नोकऱ्या निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी सोमवारी ताळगाव येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी काळा मास्क किंवा काळे कपडे घालू नयेत, असे आवाहन केले आहे. भाजपने प्रादेशिक भाषेत दिलेल्या निमंत्रणात लोकांना सकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs OMA: 31 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारतीय फुटबॉल संघाचा ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच ओमानला नमवून पटकावले कांस्यपदक

Supreme Court: शिक्षा पूर्ण होऊनही 4.7 वर्षे अधिक तुरुंगात, सुप्रीम कोर्टाचा संताप; पीडिताला 25 लाखांची भरपाई देण्याचे सरकारला आदेश

Weekly Horoscope: नशिबाचा तारा उजळणार: 'या' 4 राशींना पैसा, यश आणि मान-सन्मान लाभणार

SUV खरेदीदारांसाठी खुशखबर! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महिंद्रा, टाटा आणि टोयोटाच्या गाड्या तब्बल 3.5 लाखांनी स्वस्त

Sanguem Lottery Winner: गणपती बाप्पा पावला...! सांगे गणेश मंडळाच्या लॉटरीत होमगार्ड महिलेला जॅकपॉट; 2 BHK फ्लॅटसह 35 लाखांची लागली लॉटरी

SCROLL FOR NEXT