Goa Gram sabha Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुळगाव ग्रामसभेत पुन्हा एकदा खाण विषयावर चर्चा

Goa News: नागरी प्रश्‍नांवरून रणकंदन : पोंबुर्फात अंगावर धावून जाण्याचे प्रकार

दैनिक गोमन्तक

Goa News: रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत प्रश्‍नांवरून आज (रविवारी) विविध तालुक्यांमध्ये झालेल्या ग्रामसभांत स्थानिक रहिवाशांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनालाही धारेवर धरले. त्यातच प्रश्न विचारणारे ग्रामस्थ आणि पंचांमधील वादाचे पर्यवसान एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाल्याने पोंबुर्फा-ओळावली ग्रामसभेत गोंधळ झाला.

परिणामी, सरपंच लिवोपोलदिना फर्नांडिस नोरोन्हा यांनी ग्रामसभा स्थगित केली. भोम-अडकोण येथे ग्रामस्थांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध करताना आराखडा सादरीकरणाला आक्षेप घेतल्याने गदारोळ झाला.

पोंबुर्फा ग्रामसभा सरपंच लिवोपोलदिना फर्नांडिस नोरोन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत कार्यालयाच्या शेजारील शाळेत झाली. या ग्रामसभेला सर्व सातही पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी गत ग्रामसभेतील अहवालाचे वाचन सचिव क्रितेश कोरगावकर यांनी करून त्याला मंजुरी मिळवण्यासाठी तो सभेत मांडला. त्या अहवालातील काही मुद्यांवर ग्रामस्थांनी हरकत घेऊन चर्चा सुरू केली असता, वाद निर्माण झाला.

यावेळी एका कथित बेकायदेशीर बांधकामाला पंचायतीने दिलेली स्थगिती मागे घेतल्याने तसेच डोंगराची कापणी करून एकोशी येथे रस्त्याच्या कामाला दिलेल्या परवानगीचा मुद्दा उपस्थित करून स्थानिकांनी सरपंचांना घेरण्याचा प्रयत्न केला.

अशा बेकायदा कामांना पंचायतीने प्रोत्साहन देऊ नये, असा ठराव मंजूर करून घेतला होता. मात्र, या ठरावाच्या उलट जात स्थगिती मागे घेतल्याने काही ग्रामस्थांनी त्याला हरकत घेऊन सरपंच तसेच सचिवांकडे खुलाशाची मागणी केली.

मात्र, सरपंच निरूत्तर झाले तसेच समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. पंचसदस्य गोकुळदास हळर्णकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

परंतु सरपंच उपस्थित असताना पंचसदस्य उत्तर देत असल्याचे पाहून संतप्त ग्रामस्थांनी त्यांना हरकत घेतली. तेव्हा पंचसदस्याच्या बंधूंनी आपल्या भावाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तेथून बाचाबाची व नंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला.

यावेळी उपस्थित ग्रामस्थही आक्रमक झाले. काही ग्रामस्थांनी सरपंचांना घेरून जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

मुळगावात खाणीला विरोध :

मुळगाव ग्रामसभेत पुन्हा एकदा खाण विषयावर चर्चा झाली. विविध मुद्यांवरून ग्रामस्थांनी खाणीला विरोध दर्शविला. बफर झोन आणि गावाला मारक ठरणारे प्रश्‍‍न सुटत नाहीत, तोपर्यंत खाणीला आमचा विरोध कायम असेल. गावाच्या प्रश्‍‍नांकडे दुर्लक्ष करून खाण सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास ती बंद पाडू, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्‍थांनी घेतली. देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी सरपंच वसंत गाड यांनी तसा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मान्यता दिली.

कासारवर्णेत पंचांना घेतले फैलावर

ग्रामसभेत विषय न मांडता आणि जाहीर नोटीस न बजावताच पंचायत क्षेत्रातील लोकांना अंधारात ठेवून पंचायत क्षेत्राबाहेरील व्यावसायिकांना ना हरकत दाखले दिल्याने पंचायत मंडळाला आजच्या ग्रामसभेत स्थानिकांनी फैलावर घेतले. त्यामुळे यापूर्वी दिलेले ना हरकत दाखले रद्द करण्याचा ठराव मंजूर करून घेण्याची नामुष्की पंचायत मंडळावर आली. मोपा विमानतळासाठी जमिनी दिलेल्या स्थानिकांवर आता आर्थिक संकट ओढवल्याची समस्याही ग्रामसभेत मांडण्यात आली.

ग्रामस्थांना हवा नवा आराखडा

भोम-अडकोण गावातून जाणारा चौपदरी महामार्ग आराखडा चुकीचा असून तो रद्द करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नवीन आराखडा तयार करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या ग्रामसभेत घेण्यात आला. सरकारने घिसाडघाईने आराखडा तयार केल्याचे मत ग्रामस्थांनी मांडले. त्यासाठी राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम खाते, मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रस्ते व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पंचायतीने पत्रव्यवहार करावा, असा ठराव संमत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT