Lok Sabha Election: नावे पोचली दिल्लीत; शिक्कामोर्तब बाकी

Lok Sabha Election: काँग्रेस छाननी समितीची उद्या होणार बैठक
Goa congress
Goa congressDainik Gomanatk
Published on
Updated on

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-कॉंग्रेस पक्षांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसकडून यापूर्वीच उत्तर-गोवा या दोन्ही मतदारसंघांतून 16 जणांची नावे उमेदवारीसाठी दिल्लीला पोहोचली आहेत. दुसरीकडे भाजपने आज तातडीची बैठक घेत चारजणांची नावे दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवली.

‘आप’ आणि काँग्रेसची युती झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने रविवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपकडून उत्तर गोव्यातील जागेसाठी खासदार श्रीपाद नाईक यांच्यासह चार इच्छुकांची नावे पाठवण्याचा निर्णय झाला.

काँग्रेसच्या छाननी समितीची बुधवारऐवजी मंगळवारी बैठक होणार असल्याची माहिती गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी ‘गोमन्तक''ला दिली. काँग्रेस आणि ‘आप’ची युती झाल्यानंतर दोन्ही जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या आहेत.

Goa congress
Goa Politics: आचारसंहितेपूर्वी मतदारसंघ फेररचना आयोग नेमा

त्यामुळे आता केंद्रीय स्तरावर उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेसकडून छाननी समितीच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. राज्यांचे सर्व प्रभारी सध्या दिल्लीत आहेत.

सूद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्रीपाद नाईक यांच्यासह चौघांची नावे दिल्लीला पाठविण्याचा निर्णय झाला. श्रीपाद नाईक यांच्यासह माजी मंत्री दिलीप परूळेकर, दयानंद सोपटे आणि दयानंद मांद्रेकर यांच्या नावांचा समावेश आहे.

Goa congress
Island In Goa: गोव्यातील डॉल्फिन स्पॉटसाठी प्रसिध्द असलेल्या या बेटला नक्की भेट द्या

भाजपच्या कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, श्रीपाद नाईक, दामू नाईक, नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर, रमेश तवडकर, दत्ता खोलकर, संजीव देसाई, दिगंबर कामत, गोविंद पर्वतकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

कार्लुस, युरी स्पर्धेत

कॉंग्रेसने उत्तर आणि दक्षिण गोवा जागेसाठी प्रत्येकी आठ इच्छुकांची नावे दिल्लीला पाठविली आहेत; परंतु ऐनवेळी यात अन्य काही नावे चर्चेला येऊ शकतात, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे सध्या उत्तर गोव्यातून आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि दक्षिण गोव्यातून आमदार युरी आलेमाव यांच्याही नावाचीही चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com