Goa Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: जमीन हडप प्रकरणात मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या

संशयिताचा अनेक प्रकरणांत सहभाग

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील जमीन हडप प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड महमंद सोहेल शफी उर्फ मायकल याच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले आहे. एसआयटीने गुरुवारी रात्री ही कारवाई केली. मास्टरमाईंड महमंद अनेक प्रकरणांत गुंतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी संशयिताला म्हापसा जीएमएफसी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. तसेच याप्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. एसआयटीने या प्रकरणामध्ये गुंतलेल्या आणखी लोकांना पकडण्यासाठी आणि विक्री कराराची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी 9 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महमंद शफी याला दुसऱ्या एका जमीन हडप प्रकरणात जुनमध्ये अटक केली होती. मात्र, न्यायालयाने जामिन दिल्यानंतर तो फरार झाला होता. काही दिवसांपासून पोलिस महमंद आणि त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी प्रयत्नरत होते. हे दोन्ही संशयित एसआयटीला हवे असून यांच्याकडून या प्रकरणाची अधिक तपशील मिळवणे गरजेचे आहे. 2013 आणि 2014 साली सुद्धा महमंदविरोधात 3 गुन्हे नोंद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

SCROLL FOR NEXT