Bull Competition  Dainik Gomantak
गोवा

मांद्रेत उधळल्या बैलांच्या झुंजी

पोलिसांची कारवाई: नाईक यांच्‍या बदलीसाठी राजकीय ‘वजन’

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदारसंघात आज शनिवारी आयोजित बैलांच्या झुंजी पेडणेचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी उधळून लावल्याबद्दल त्यांची बदली अटळ असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा वाढदिवस असल्याने काही धिरयोप्रेमींनी चार बैलांच्या झुंजी विविध ठिकाणी आयोजित केल्या होत्या. त्याचा सुगावा नाईक यांना आदल्‍या दिवशी रात्री लागल्यानंतर त्यांनी झुंजीत सामील होणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

पोलिस निरीक्षक नाईक यांनी सध्या पेडणे तालुक्यातील बेकायदा रेतीव्यावसायिकांच्या होड्यांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. शिवाय जुगाराचे अड्डेही बंद केले आहेत. आता बैलांच्या झुंजी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असताना, त्या त्‍यांनी उधळून लावल्यामुळे काही राजकारण्यांचे समर्थक आणि राजकारणीही संतापलेले आहेत. त्यामुळेच नाईक यांची बदली अटळ असल्याचे बोलले जात आहे. नाईक यांच्‍या बदलीसाठी पेडणे तालुक्यातील राजकारण्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले वजन वापरण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, नाईक यांची राजकीय सुडबुद्धीने बदली केल्यास पेडणे तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT