52 Dhangar brothers Dainik Gomantak
गोवा

लाखेरेत 52 धनगर बांधव धोंड एकत्रितपणे पाळतात; लईराईचे व्रत

यंदा एक नवीन धोंड भक्तगणाची भर पडली आहे

दैनिक गोमन्तक

डिचोली: शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डिचोलीत गावोगावी धोंड भक्तगणांचे व्रत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात चालू आहे. डिचोली पालिका क्षेत्रातील लाखेरे येथे चक्क 52 धनगर बांधव धोंड भक्तगण एकत्रितपणे लईराईचे व्रत पाळत आहेत.

यंदापासून हे व्रत लाखेरे येथे नव्यानेच बांधलेल्या श्री बाळूमामा मंदिरात पाळण्यात येत आहे. यापूर्वी धनगर बांधव धोंड भक्तगण तेथीलच कडकडे यांच्या भाटात हे व्रत पाळत होते. व्रत पाळणाऱ्या या 52 धोंडगणांमध्ये 15 वर्षे ते 85 वर्षांपर्यंतचे धोंड आहेत. दरवर्षी नवीन धोंड भक्तगण पुढे येत असून यंदा एक नवीन धोंड भक्तगणाची भर पडली आहे, अशी माहिती बाबलो ताटे यांनी दिली. 52 धोंड एकत्रित व्रत पाळताना मिळणारा आनंद आणि उत्साह वेगळाच आहे असे मत या धोंड भक्तगणांनी व्यक्त केले आहे.

आज ‘व्हडले जेवण’

जत्रेच्या आदल्या रात्री म्हणजेच बुधवारी धोंड भक्तगण व्रत पाळतात त्या सर्वत्र ठिकाणी ‘व्हडले जेवणा’चा कार्यक्रम होणार आहे. देवीचा प्रसाद अशी भावना बाळगून या व्हडले जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वत्र अनेकजण उपस्थित राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT