Iranian Player Dancing Dainik Gomantak
गोवा

Chess World Cup 2025: '...अन् तो डिस्कोत मनसोक्त नाचला', 23 वर्षांनी गोव्यात बुद्धीबळ विश्वचषक; आयोजकांनी सांगितला इराणी खेळाडूचा 'तो' किस्सा

Iranian Player Dancing: वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपसाठी आलेल्या खेळाडूंनी खूप मजा केली होती. आम्ही डिस्कोची सोय केली होती. यामध्ये इराणी खेळाडूने दिवसभर मनसोक्त डान्स केला होता.

Manish Jadhav

FIDE World Cup 2025 In Goa: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुद्धीबळाची जागतिक संस्था FIDE (International Chess Federation) ने एक मोठी घोषणा केली. या घोषणेनुसार, यंदाचा (2025) बुद्धीबळ विश्वचषक गोव्यात आयोजित केला जाणार आहे. तब्बल 23 वर्षांनी ही स्पर्धा भारतात आयोजित होत असून भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यंदाचा हा विश्वचषक 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील 206 सर्वोत्तम खेळाडू सहभागी होणार असून विजेत्यासाठी तब्बल 2 दशलक्ष (सुमारे 16 कोटी रुपये) एवढे बक्षीस आहे.

2002 नंतर पुन्हा भारतात

याआधी, शेवटचा बुद्धीबळ विश्वचषक 2002 मध्ये हैदराबाद येथे झाला होता, जिथे भारताचा महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद याने विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा ही स्पर्धा भारतात, विशेषतः गोव्यासारख्या सुंदर राज्यात परत येत आहे. 2002 मध्येही गोव्याने एका मोठ्या बुद्धीबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. त्यावर्षी, 9 ते 20 डिसेंबर दरम्यान 'वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप' (World Junior Championship) गोव्यात झाली होती. तेव्हा 50 हून अधिक देशांतील 150 पेक्षा जास्त युवा खेळाडू गोव्यात आले होते. त्यावेळी 20 वर्षांच्या लेव्हॉन आरोनियन या आर्मेनियाच्या खेळाडूने विजेतेपद पटकावले होते.

मनोहर पर्रीकर यांचा दूरदृष्टी

त्यावेळी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर होते. गोवा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव आशेष केणी सांगतात की, 'पर्रीकर यांनी स्वतःहून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली होती. त्यांचा उद्देश गोव्यातील पर्यटनाला फायदा व्हावा हा होता. त्यावेळी रशियन पर्यटक गोव्यात मोठ्याप्रमाणात येत नव्हते. त्यामुळे पर्रीकर यांनी मला सांगितले की, ही स्पर्धा आयोजित करा जेणेकरुन रशियन्सना गोव्याबद्दल माहिती होईल.'

आणि ही योजना यशस्वी झाली. सोशल मीडियावर या स्पर्धेची खूप जाहिरात झाली. अनेक रशियन लोकांनी ही स्पर्धा पाहिली आणि त्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला येऊ लागले. आजही अनेक रशियन पर्यटक गोव्याला येतात, आणि यामागचे कारण 2002 मधील बुद्धीबळ स्पर्धाच होती, असे केणी सांगतात.

गोव्याची आदरातिथ्य आणि संस्कृतीची छाप

2002 च्या स्पर्धेनंतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे गोव्याचे आदरातिथ्य आणि तिथली संस्कृती. आसेश केणी सांगतात की, 'ज्या अधिकाऱ्यांनी याआधी अनेक स्पर्धांमध्ये हजेरी लावली होती, त्यांनी आम्हाला सांगितले की, गोव्याची खाद्यसंस्कृती आणि आदरातिथ्य सर्वात उत्कृष्ट होते.'

गोव्याच्या (Goa) संस्कृतीनेही परदेशी खेळाडूंना खूप आकर्षित केले. केणी सांगतात की, 'मला आठवते की, वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपसाठी आलेल्या खेळाडूंनी खूप मजा केली होती. आम्ही डिस्कोची सोय केली होती. इराणमध्ये डान्स करण्याची परवानगी नाही, पण एका इराणी खेळाडूने दिवसभर मनसोक्त डान्स केला होता.'

2002 च्या त्या स्पर्धेमुळे गोव्याला खूप आत्मविश्वास मिळाला होता. 'तेव्हा पहिल्यांदाच आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करत होतो. अनेक देशांचे खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पंच आले होते. या अनुभवामुळे गोव्याला जागतिक दर्जाच्या स्पर्धा यशस्वी करण्याचे बळ मिळाले,' असे केणी म्हणाले. आता 23 वर्षांनंतर पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम खेळाडू गोव्याला भेट देणार आहेत आणि 2002 च्या त्या आठवणी ताज्या होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Gangwar: मुंगूल-मडगाव गँगवॉरचे बिश्नोई गँगशी कनेक्शन; कुख्यात गुंड 'ओमसा'ला राजस्थानमधून अटक

Viral Video: “मी मन पाहून प्रेम करते!” म्हणणाऱ्या मुलीला पठ्ठ्याचं जबरदस्त उत्तर, व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक; म्हणाले...

Vishwajit Rane Meet Fadanvis: मंत्री विश्वजीत राणेंनी मुंबईत घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Viral Video: उंदीर मामाने पळवला गणपती बाप्पाचा मोदक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; फोंड्यातील मजेशीर घटनेने वेधले लक्ष

Goa liquor Smuggling: जीव धोक्यात, तिजोरीची लूट; दारु तस्करीबाबत विजय सरदेसाईंचे वित्त सचिवांना पत्र

SCROLL FOR NEXT