BJP in Goa Dainik Gomantak
गोवा

पणजीच्या हाय-प्रोफाईल लढाईत, भाजपची ताकद पणाला

भाजपा नेते म्हणतात, उत्पल पर्रीकर यांना 'ही' धोरणात्मक बाजू समजलेली दिसत नाही

दैनिक गोमन्तक

गोव्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे दोन आठवडे उरले असताना, पणजी येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयात झालेल्या चर्चेत निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय तत्त्वांइतकेच स्मार्ट गणिते किती महत्त्वाची आहेत यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

“उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे त्यांच्या वडिलांप्रमाणे (दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर) साधे आहेत, परंतु ते याआधी राजकारणात कधीच नव्हते आणि त्यांना ही धोरणात्मक बाजू समजलेली दिसत नाही,” अस मत भाजपच्या एका नेत्याने मांडले आहे.

भाजपने उत्पल यांना त्यांच्या वडिलांच्या पणजीच्या जुन्या जागेवरून तिकीट नाकारले, त्याऐवजी त्यांना इतर पर्याय देऊ केले आणि विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

38 वर्षीय उत्पल यांच्यासाठी ही लढत फार महत्वाची आहे. कारण या मतदारसंघातून त्यांचे वडिल निवडून (Election) येत होते. हा मतदारसंघ वारसा हक्क बजावत आहे. भाजपसाठी हे या पार्श्वभूमीवर राजकीय अस्थिरता देखील निर्माण करत आहे.

पणजीचे (Panaji) तिकीट उत्पल किंवा मोन्सेरात यांना द्यायचे की नाही या निर्णयावरुन पक्षात अनेक वादंग निर्माण झाले होते. नंतर भाजपकडून मोन्सेरात यांना तिकीट देण्यात आले. राज्याच्या राजधानीत कोण जिंकेल यावरून पुढील रणनीती देखील ठरणार आहे. तसेच गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील सुमारे तीन ते चार जागांवर भाजपचे भवितव्य ठरणार आहे.

भाजपने मोन्सेरातला का निवडले?

40 सदस्यीय विधानसभेत भाजप (BJP) 22 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाटत असतानाच, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांनी म्हटले आहे की, सध्याचे सरकार मजबूत सत्ताविरोधी पक्षांचा सामना करत आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC) आणि इतर प्रादेशिक संघटनांनी आपल्या उमेदवारांना रिंगणात उतरवून दिल्याने विरोधातील जागांवर विरोधीपक्षातील कमी उमेदवार निवडून येतील हा भाजपचा सर्वात मोठा फायदा आहे, असे त्यांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT