Illegal Bike Race  
गोवा

Illegal Bike Race: गोव्यात तरूणांची रस्त्यावर खुलेआम जीवघेणी बाईक रेस; पोलिस, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

व्हायरल व्हिडिओत दोन दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकी शर्यतीमध्ये पळवत असल्याचे दिसतेय

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Bike Race एकीकडे गोवा पोलीस वाहतुकीचे नियम तयार करून रस्ते अपघात रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र बेकायदेशीररीत्या दुचाकींची शर्यत लावून जीवाशी खेळ खेळाला जात असल्याचा प्रकार सुरु आहे. नुवे येथे एका बेकायदेशीर दुचाकी शर्यतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

सदर व्हिडिओत भर रस्त्यावर दुचाकी शर्यतींचे आयोजन केले गेले असून दोन दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकी शर्यतीमध्ये पळवत आहेत. मुख्य म्हणजे यातील एकाही दुचाकीस्वराच्या डोक्यावर ना हेल्मेट आहे ना शर्यतीकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरण्यात येणारी साधने. अशा धोकादायक परिस्थितीत हे दुचाकीस्वार वेगात दुचाकी पळवताना दिसत आहेत.

या रेसचे आयोजन कुणी केले होते? याबाबत अद्याप माहिती प्राप्त झाली हाती. काही कालावधीपूर्वी म्हापसा येथे बाईक रेसचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रात्यक्षिक करताना झालेल्या अपघातात एका मोटरसायकल स्वार स्पर्धकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT