Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Viral Video : 15 वर्ष मत दिलं, तुम्ही काय केलं; भाजप आमदाराला मतदाराचा सवाल

तृणमूल काँग्रेसने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारसभांवर बंदी असल्याने घरोघरी जात नेते प्रचार करताना दिसत आहेत. यातच तृणमूल काँग्रेसने एक प्रचाराचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याची सध्या गोव्यात तुफान चर्चा सुरू आहे. भाजप (BJP) आमदार नीलकंठ हळर्णकर यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मतदाराच्या घरी प्रचाराला गेल्यावर आमदाराला रोषाचा सामना करावा लागला. मतदाराने आमदार नीलकंठ हळर्णकर यांना त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती विचारल्याच समोर आलं आहे.

आम्ही तुम्हाला गेली 15 वर्ष मतदान केलं, मात्र या काळात तुम्ही काय केलं? असा प्रश्न मतदाराने (Voter) विचारला. कोरोनाकाळात तुम्ही ढुंकूनही पाहिलं नाहीत आणि आता मतं मागायला आलात अशा शब्दात एका मतदाराने हळर्णकर यांना फटकारले आहे. यावर आमदार नीलकंठ हळर्णकर यांनीही मतदाराला समजवायचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ तृणमूल काँग्रेसने (TMC) शेअर केला आहे. गोव्यातील जनता भाजप आणि काँग्रेसला कंटाळली आहे. व्हिडिओ शेअर करत तृणमूलने काँग्रेससह भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT