Goa Power Shutdown
Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Goa: गोव्यात उद्या 'या' भागामध्ये वीजपुरवठा राहणार बंद

गोमंतक ऑनलाईन टीम

Power Shutdown in Goa: सांकवाळ उपकेंद्रातील 11 केव्ही फीडरच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे उद्या, 16 मे रोजी गोव्यातील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत राहणार आहे.

16 मे रोजी सकाळी 9 पासून ते दुपारी 2 पर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. बिट्स पिलानी कॅम्पस, माऊंट लिटेरा स्कूल आणि झुआरी नगर जय किसान क्लब या भागामध्ये हा वीजपुरवठा खंडीत राहणार आहे.

या परिसरातील सर्व व्यावसायिक आणि घरगुती वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दक्षिण गोव्यात देखील वीज विभागाकडून 21 मे रोजी वीज बंद राहणार आहे. याबाबत अधीक्षक अभियंता, दक्षिण गोवा कार्यालयाने जारी केलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, विद्युत विभागाने दक्षिण गोव्यातील EHV उपकेंद्रांवर 220KV शेल्डे उपकेंद्र, 220 KV कुंकळी उपकेंद्र आणि 110 KV वेर्णा येथे वार्षिक देखभालदुरूस्ती करण्यात येणार आहे.

रविवार 21 मे 2023 रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत उपकेंद्रांत हे दुरूस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे वरील कालावधीत फोंडा तालुका वगळता संपूर्ण दक्षिण गोव्यात वीजपुरवठा होणार नाही.

काणकोण, सासष्टी, सांगे, केपे, मुरगाव या तालुक्यांसह धारबांदोरा तालुक्याचा काही भाग, आणि इतर काही व्हिलेज पंचायत क्षेत्रात वीज नसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT