गोव्यात (Goa) जवळपास दोन लाख पीएफ (PF) वापरात आहेत. त्‍यातील ११,३३१ जणांनी अजूनही पीएफची पूर्ण प्रक्रिया (Process) केलेली नाही.  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 11 हजारांपेक्षा जास्त पीएफधारकांची प्रक्रिया अपूर्ण

‘आझादी का अमृतमहोत्सव’ निमित्ताने कुटुंबाची माहिती अपलोड करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, जेणेकरून लोकांना सोयीचे होईल, असे कोटकर (Atul Kotkar) म्‍हणाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) जवळपास दोन लाख पीएफ (PF) वापरात आहेत. त्‍यातील ११,३३१ जणांनी अजूनही पीएफची पूर्ण प्रक्रिया (Process) केलेली नाही. या सर्वांची केवायसी (KYC), कुटुंबाची माहिती, आधारकार्ड व मोबाईल नंबर एकमेकांशी जोडणे (लिंक) राहून गेले आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण कराव्‍यात, असे आवाहन पीएफचे प्रादेशिक आयुक्त अश्विनीकुमार गुप्ता (Ashwini Kumar Gupta) यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रादेशिक आयुक्त अतुल कोटकर (Atul Kotkar) व योगेंद्र सिंग शेखावत (Yogendra Singh Shekhawat) उपस्थित होते.

सर्वसामान्यांसाठी पीएफ खूप गरजेचा असतो. अशा वेळी लोकांना फसवून त्यांचे पैसे हडप करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे लोकानी अशा गोष्टींना बळी न पडता थेट पीएफ कार्यालयाला भेट द्यावी व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले. ‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्ताने कुटुंबाची माहिती अपलोड करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, जेणेकरून लोकांना सोयीचे होईल, असे कोटकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT