Lok Sabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: उमेदवारीचा पेच कायम; पण वैयक्तिक पातळीवर प्रचार सुरू

Lok Sabha Election: म्हापसा मतदारसंघ : शहरातील विकासकामांबाबत उपेक्षा, लोकांच्या मनात खदखद कायम

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election:

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागली असून, त्याअनुषंगाने राजकीय पक्ष रणनिती व मतदारांची नाडी तपासण्याचा प्रयत्न करताहेत. सध्या भाजप, आरजीने आपले उमेदवार जाहीर केले असले तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस दरवेळीप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात पिछाडीवर आहे.

जे इच्छुक उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर दावा करताहेत, त्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रचार सुरू केलेला दिसतो. सध्या म्हापशात लोकसभेच्या प्रचाराची मोठी रणधुमाळी नसली तरी भाजप व आरजीने थोड्या प्रमाणात काय असेना, हातपाय मारण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान, म्हापसा शहरातील अपेक्षित विकासकामांबाबत लोकांच्या मनात खदखद व उदासिनता असली तरीही मतदारसंघ पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीला पंसती देणार की, यावेळी किमान वेगळा विचार करणार याबाबत ठोस सांगता येणार नाही. कारण म्हापसावासीय उघडपणे बोलण्यास कचरतात. आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीला लोकसभेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे लोकांत या लोकसभेबाबत तितकीशी उत्सुकता सध्यातरी दिसत नाही.

म्हापसा मतदारसंघात मागील कित्येक वर्षे भाजपचा वरचष्मा असला तरी, शहरात अपेक्षित विकास दिसत नाही. हे खुद्द म्हापसेकर खासगीत बोलत असले तरी, राजकीय पटलावर हा राग दिसत नाही. अनेकजण थेटपणे बोलत नसल्याने म्हापसेकरांच्या मनातील कोडे न सुटणारे! परंतु, येथील मतदार हे अधिकतरपणे बाबूश घराणे व भाजपसोबत राहणे पसंत केल्याचे राजकीय चित्र सांगते.

  • काँग्रेसकडे सध्या नेतृत्वाची उणीव दिसते. काँग्रेसकडे मोजकेच नेतेमंडळी म्हापशात वावरताना दिसतात.

  • याउलट भाजपची बूथवरील ताकद ही मोठी आहे. शिवाय कार्यकर्त्यांची फौज इतरांच्या तुलनेत जास्तच आहे.

  • बाबूश घराण्याची स्वतःची अशी वोटबँक आहे. ज्यात परप्रांतीय व स्थलांतरीतांचा कल हा आजवर बाबूश घराण्यासोबत आहे.

  • काँग्रेसचेही स्वतःचे मतदार आहेत. आणि आरजीच्या उमेदवाराने गेल्या विधानसभेत हजार मते मिळविली होती. ती फक्त आरजी पक्षामुळे. त्यामुळे आरजीला कमी लेखून चालणारे नाही.

'आरजी’ने जाणली नाडी

आरजीने म्हापसा शहरात बऱ्यापैकी चाचपणी करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे, आरजीने आपले उत्तर व दक्षिण गोवा उमेदवार म्हापसा शहरातील सभेतून जाहीर केले होते. त्याचप्रमाणे, आरजीने म्हापसा मार्केटमधील व्यापारी व विक्रेत्यांचा प्रश्न हाती घेऊन सर्वसामान्यांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करून एकप्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत.

भाजप व आरजीनेच आपले उमेदवार जाहीर केलेत. तर काँग्रेसच्या अनेक संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, दीर्घ अनुभव असलेले श्रीपाद नाईक सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. जरी ते हे चांगले व्यक्तिमत्त्व असले तरी राजकीय क्षमता त्यांनी दाखविली नाही. लोकांचे प्रश्न जसे की, खाण व्यवसाय, पर्यटनाशी निगडित अनेक विषय राष्ट्रीय पातळीवर सोडविण्याची गरज होती. ते आजही खितपत पडलेत. त्यादृष्टीने भाऊंचे प्रगती पुस्तक हे रिकामेच. निवडणूक अटीतटीची जाईल.
महेश राणे
मागील पंचवीस वर्षांचा इतिहास पाहता म्हापसेकर हे भाजप म्हणजेच बाबुशसोबत राहिले आहेत. श्रीपाद नाईक हे मागील उत्तरेचे नेतृत्व करीत असले तरी त्यांनी उत्तर गोवासाठी नक्की काय केले? तरीही म्हापसेकर यावेळी भाजपसोबत जातील.दुसरीकडे, काँग्रेसवर विश्वास असला तरी नेत्यांच्या पक्षांतराच्या उड्यांमुळे लोक गोंधळात पडलेत. आरजीची ध्येयधोरणे वेगळी असली तरी गोव्यासाठी त्यांची पोटतिडीक दिसते.
नारायण राठवड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT