In Goa, stocks of liquor have been confiscated from goa excise department
In Goa, stocks of liquor have been confiscated from goa excise department Dainik Gomantak
गोवा

गोव्यात अबकारी खाते आणि पोलिस प्रशासन कंबर कसून सज्ज..

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात ठिकठिकाणी अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. आणि याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे सगळे प्रकार थांबण्यासाठी राज्यामध्ये अधिकाऱ्यांमार्फत कडक तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर टाकण्यात आलेल्या धाडीत अधिकाऱ्यांना अवैध दारू आणि दुकानांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त दारूसाठा आढळून आला. हा सर्व साठा अबकारी खात्यातर्फे जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यात अबकारी खाते आणि पोलिस (Goa Police) प्रशासन सतर्क असून तपासण्यांचे प्रमाण वाढले आहे. काल दिवसभरात तब्बल 4 वेगवेगळ्या ठिकाणी लाखों रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात अला आहे. (In Goa, stocks of liquor have been confiscated from the goa excise department)

पेडणे (Pernem)

पोलिसांनी दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये वेगवेगळ्या ब्रँडची दारू जप्त केली आहे, जी एका रेस्टॉरंटच्या खाजगी गोदामात 4,53,030 रुपये तर दुसरे मिनी सुपर मार्केटमध्ये 50780 रुपये किमतीचे मद्य उत्पादन शुल्क विभाग पेडणेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

कोलवा (Colva)

ए के वाईन स्टोअर या खासगी जागेवर गुन्हे शाखेने छापा टाकला असून; गोदामालगतच्या घरात साठा करून ठेवलेली तब्बल 3,08,940 रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली असून; अवैध जप्त केलेली दारू मडगाव उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

काणकोण (Canacona)

काणकोण येथे कोकण रेल्वेच्या नगर्से काणकोण येथील स्टेशनवर बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली आहे. अज्ञात प्रवाश्यांचा अवैध दारूसाठा काणकोण पोलिसांनी जप्त केला 5256 रुपये किमतीचा हा साठा असून, पुढे काणकोणच्या अबकारी कार्यालयाकडे ससुपुर्द करण्यात आला आहे.

वास्को (Vasco)

गोव्यातील अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वास्को येथे अबकारी खात्याने (Excise Department) टाकलेल्या धाडीत तब्बल 57 हजारांची देशी-विदेशी बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या गुण्यात सहभागी असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT