goa fish market Dainik Gomantak
गोवा

Goa: मासळीच्या दरात वाढ; पापलेट किंचित स्‍वस्‍त

मध्यमवर्गीयांच्या खिशाला हे दर परवडणारे नाहीत.

दैनिक गोमन्तक

पणजी: मासळी म्हणजे गोमंतकीयांचा जीव की प्राण. मात्र अलीकडच्‍या काही दिवसांत मासळीच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांच्या खिशाला हे दर परवडणारे नाहीत. मात्र पापलेट किंचित स्‍वस्‍त झाल्‍यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. 1200 रुपये प्रतिकिलोवरून दर 900 ते 1000 रुपयांवर आला आहे. पण हा चविष्‍ट मासा नेहमीच सामान्‍यांना वाकुल्‍या दाखवत आला आहे.

आज पणजी मासळी बाजारात बांगडा, तारली, माणकी, समुद्री खेकडे, कर्ली, वेर्ली, कोमेखापी, तिसऱ्या, खुबे, पापलेट, कोळंबी, इसवण व इतर विविध प्रकारची मासळी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होती. गेल्या आठवड्यात पापलेटचे दर 1200 ते 1400 रुपये प्रतिकिलो होते. मात्र आता त्‍यात घट झाली आहे. बांगडे, तारली, इसवण, कोळंबी यांच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत. लहान आकाराचे बांगडे 150 रुपये किलो दराने उपलब्ध होते.

दर प्रतिकिलो (रुपये)

तारली 150

बांगडे 150-200

टोकी 100-150

समुद्री खेकडे 200

लेपो 350

कर्ली 350

माणकी 400

वेर्ली 400

कोळंबी 600

पापलेट 900-1000

इसवण 750-800

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT