Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

'राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षाची साथ घेऊनच करावं लागणार सरकार स्थापन'

राज्यात विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार महत्वाची भूमिका बजावणार

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभेत राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षाची साथ घेऊनच सरकार स्थापन करावे लागणार असे संकेत सर्व मतदार संघातून झालेल्या मतदानावरुन जाणवू लागले आहे. राज्यातील 12 तालुक्यातून एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची माहिती राजकीय (Politics) वर्तुळातून सांगण्यात येत आहे. मुरगाव तालुक्यातून चारही मतदारसंघात वेगवेगळे पक्ष निवडून येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

गोव्यात भाजप किंवा काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी प्रादेशिक पक्षाबरोबर अपक्षांची साथ घेऊन सरकार स्थापन करावे लागणार असल्याचे राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. 2012 भाजपला स्पष्ट बहुमत दिले ते एकमेव नेत्यामुळे स्व: मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वामुळे. आज त्यांच्या सारखे नेतृत्व एकाही पक्षाकडे नसल्याने राज्यात युतीचे किंवा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांना व सर्वात महत्त्वाचा घटक पक्ष म्हणजे अपक्ष, राज्यात विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. एकंदरीत राष्ट्रीय पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाची गरज भासणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत मूरगाव तालुक्यातून भाजपला चारही मतदारसंघात स्पष्ट बहुमत मिळाले होते. मूरगावातून मिलिंद नाईक, वास्को कार्लोस अल्मेदा, दाबोळीतून माविन गुदिन्हो, कुठ्ठाळीतून एलिना साल्ढाणा निवडून आल्या होत्या. यात खरी लढत झाली ती मूरगाव मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. यात नाईक पोस्टल मतांच्या आधारे निवडून आले होते. वास्कोतून कार्लोस आल्मेदा आपल्या चतुराईने मतदारांना विश्वासात घेऊन निवडून आले होते. दाबोळीतून माविन गुदिन्हो मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. तर कुठ्ठाळीतून एलिना साल्ढाणा काही मतांनी निवडून आल्या होत्या. यंदा मात्र भाजपला चारही मतदारसंघ राखता येणार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. चारही मतदारसघात वेगवेगळे पक्षाचे उमेदवार निवडून येणार असून यात एक अपक्ष उमेदवार निवडून येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT